लगेच खरेदी करा! तुमच्या आयपीएल २०२६ सामन्यांची तिकिटं खरेदी करण्यासाठी गाइड
तुम्ही मागच्या वर्षभरापासून याच गोष्टीची वाट पाहत होतात. वर्षाचा तो सीझन आलाय!
आयपीएल २०२६ लिलाव ✅
आयपीएल २०२६ वेळापत्रक ✅
खेळाडूंचे आगमन✅
सराव ✅
सामन्याची तिकिटे ❓
आम्ही एक गुड न्यूज घेऊन आलो आहोत. आम्ही तारखा घेऊन आलो आहोत. स्लॉट्स घेऊन आलो आहोत. तुमचे फोन तयार ठेवा आणि तिकिटे विकली जाण्यापूर्वी खरेदी करण्यासाठी योग्य ती बटणे दाबण्यासाठी तयार राहा. चला कॅलेंडरवर खूण करा...
घरच्या खेळपट्टीवरील दोन सामन्यांची तिकिटे MI vs KKR (२९ मार्च २०२६) आणि MI vs RCB (१२ एप्रिल २०२६) विक्रीसाठी उपलब्ध असतील.
तिकीट विक्री टप्पा १: गुगल पेसाठी खास विंडो (जीपे यूपीआय वापरकर्ते तिकिटे बुक करू शकतात.)
सुरूवात: १९ मार्च २०२६, दुपारी १२.०० वाजता.
संपणार: २१ मार्च २०२६, दुपारी १२.०० वाजता.
तिकीट विक्री टप्पा २: एमआय गोल्ड, सिल्व्हर आणि ज्युनियर सदस्यांसाठी खरेदी टप्पा
सुरूवात: २१ मार्च २०२६, दुपारी ३ वाजता.
संपणार: २२ मार्च २०२६, दुपारी ३ वाजता.
तिकीट विक्री टप्पा ३: एमआय ब्लू सदस्य आणि बीएमएस पूर्व नोंदणीकृत सदस्यांसाठी खरेदी टप्पा
सुरूवात: २२ मार्च २०२६, सायं ५ वाजता.
संपणार: २३ मार्च २०२६, सायं ५ वाजता.
तिकीट विक्री टप्पा ४: सर्वांसाठी तिकिटे उपलब्ध
सुरूवात : २३ मार्च २०२६, सायंकाळी १८.०० पासून.
Head here to grab your MI membership
महत्त्वाची माहिती: हे फायदे मिळण्यासाठी तुम्ही एमआय मेंबरशिप १९ मार्च २-२६ रोजी रात्री २३.५९ पूर्वी घेतलेली असायला हवी. mumbaiindians.com वर वापरलेले क्रिडेन्शियल्स (फोन नंबर आणि इमेल आयडी) वापरून सदस्यांना BookMyShow वर साइन इन करावे लागेल.
पलटन, वानखेडेवर भेटूया ब्लू अँड गोल्डमध्ये!