रोहितचा अगदी हिटमॅन स्टाइलमध्ये गुडबाय

कॉमनवेल्थ बँक मालिका २००८ मध्ये श्रीलंकेविरूद्ध ७० धावांच्या नाबाद खेळापासून सुरू झालेली ही प्रेमकथा भारताच्या ऑस्ट्रेलिया दौरा २०२५ मध्ये अप्रतिम नाबाद १२१ धावांसह सुफळ संपूर्ण झाली. 💙

त्याचे फटकेबाजीसाठी सर्वांत आवडते मैदान? ख्यातनाम सिडनी क्रिकेट मैदान!

त्याच्या या अविस्मरणीय आंतरराष्ट्रीय करियरदरम्यान रोहितने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना आपल्या अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. त्याने सर्व स्वरूपांत व सर्व ठिकाणी धावा कुटून प्रतिस्पर्ध्याला आश्चर्यचकित केले.

त्याचा हा प्रवास जितका प्रिय आहे तितका वैयक्तिकही वाटतो. तो मैदानात उतरतो त्या प्रत्येक वेळी आपल्याला रो स्पेशल येणार याची खात्री असते. मग काहीही होवो.

…रोहितने केलेली त्याची शेवटची अप्रतिम खेळी प्रत्येक रोहित पगलूच्या डोळ्यांत पाणी आणणारी आहे.  

त्याने ऑसीजच्या गोलंदाजांना चांगलेच टोलवून लावत १३ चौकार आणि तीन षट्कारांच्या मदतीने नाबाद १२१* धावा केल्या आणि भारतीय संघाला नऊ विकेट्सनी विजय मिळवून द्यायला मदत केली. India win the encounter by nine wickets.

सामन्यानंतरच्या सादरीकरणात आपल्या हिटमॅनने ऑस्ट्रेलियात खेळणे किती प्रिय आहे हे सांगितले आणि आपल्याला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी सर्व चाहत्यांचे आभार मानले.

“मला कायमच इथे येऊन आणि या ठिकाणी क्रिकेट खेळायला (सिडनीमध्ये) मजा आली आहे. त्याने आपल्या ऑस्ट्रेलियाच्या २००८ पहिल्या दौऱ्यातील आठवणींना उजाळा दिला. मला खूप मजा आली. खूप धमाल होती. मागच्या १५ वर्षांत काय काय घडले हे विसरून जाऊया. मला इथे खेळताना खूप आनंद मिळतो. विराटलाही नक्कीच आनंद मिळत असेल. थँक्यू ऑस्ट्रेलिया.”

“आपण अशा ठिकाणी येतो तेव्हा आपण स्वतःला एक फलंदाज म्हणून, खेळाडू म्हणून आव्हान देतो. मलाही हेच अपेक्षित आहे. हे सगळे सोपे असेल असे मला एकदाही वाटले नाही. मी जे काही करतो ते करायला मला खूप आवडते. मी हे करत राहीन अशी आशा आहे,” तो म्हणाला.

तर या नोटवर त्याने ऑस्ट्रेलियात केलेल्या ५०+ धावा पाहूया.

धावा

प्रतिस्पर्धी

स्वरूप

स्थान

महिना आणि वर्ष

१२१*

ऑस्ट्रेलिया

ओडीआय

सिडनी

ऑक्टोबर २०२५

७३

ऑस्ट्रेलिया

ओडीआय

एडलेड

ऑक्टोबर २०२५

५३

नेदरलँड्स

टी२०आय

सिडनी

ऑक्टोबर २०२२

१३३

ऑस्ट्रेलिया

ओडीआय

सिडनी

जानेवारी २०१९

६३*

ऑस्ट्रेलिया

कसोटी

मेलबर्न

डिसेंबर २०१८

६०

ऑस्ट्रेलिया

टी२०आय

मेलबर्न

जानेवारी २०१६

९९

ऑस्ट्रेलिया

ओडीआय

सिडनी

जानेवारी २०१६

१२४

ऑस्ट्रेलिया

ओडीआय

ब्रिस्बेन

जानेवारी २०१६

१७१*

ऑस्ट्रेलिया

ओडीआय

पर्थ

जानेवारी २०१६

१३७

बांग्लादेश

ओडीआय

मेलबर्न

मार्च२०१५

५७*

यूएई

ओडीआय

पर्थ

फेब्रुवारी २०१५

१३८

ऑस्ट्रेलिया

ओडीआय

मेलबर्न

जानेवारी २०१५

५३

ऑस्ट्रेलिया

कसोटी

सिडनी

जानेवारी २०१५

६६

ऑस्ट्रेलिया

ओडीआय

सिडनी

मार्च २००८

७०*

श्रीलंका

ओडीआय

कॅनबेरा

फेब्रुवारी २००८