{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक नोंदवणे ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे. पाच विकेट्स घेणे हीदेखील दुर्मिळ बाब आहे. एकाच सामन्यात दोन्ही गोष्टी करण्याची कल्पनाच करता येत नाही. अमेलिया केरने वयाच्या १७ व्या वर्षी ही कामगिरी करून दाखवली.
दोन फर्स्ट क्लास क्रिकेटपटूंची मुलगी तसेच किवी कसोटी खेळाडू ब्रुस मुरे यांची नात असलेल्या तिने लेग स्पिनर म्हणून खेळायला सुरूवात केली होती. शालेय क्रिकेटमध्ये ती कायम सलामी फलंदाज म्हणून खेळायला येत असे. २०१६ मध्ये तिने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांना प्रभावित केले.
तिने मुंबई इंडियन्सने २०२३ डब्ल्यूपीएल चषक उचलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि आता ती वर्ल्ड कप जिंकून आली आहे. तिला २०२४ मध्ये आयसीसी क्रिकेटर ऑफ दि इयर पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.
ब्लू अँड गोल्डमध्ये काही ओडीआय द्विशतके करण्यात आली आहेत आणि त्यासाठी केर परफेक्ट आहे.