सोनम
सोनम
यादव
यादव
जन्मतारीख
जुलै 18, 2007
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
सोनम बाबत

उत्तर प्रदेशच्या गावांमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीतून आलेली सोनम यादव डब्ल्यूपीएलसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. सात भावंडांमध्ये सर्वांत लहान असलेल्या सोनमचे क्रिकेटचे कौशल्य तिचा भाऊ आणि प्रशिक्षकाने अत्यंत कमी वयातच ओळखले. तिने फलंदाज म्हणून सुरूवात केली परंतु तिच्या डावखुऱ्या स्पिनने तिला प्रचंड उंचीवर नेऊन ठेवले.


२०१७ मध्ये १९ वर्षे वयाखालील सामन्यात यूपीसाठी ती खेळायला आली आणि २०१८ मध्ये तिने आंध्र प्रदेशविरूद्ध उत्तर प्रदेशला देशांतर्गत १९ वर्षे वयाखालील सामन्यात विजय मिळवण्यास मदत केली. या कमी धावसंख्या असलेल्या सामन्यात तिने शेवटच्या तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर तिची प्रगती अत्यंत वेगाने झाली. २०२३ मध्ये ती पहिल्या यू-१९ टी२० वर्ल्ड कपमध्ये विजेत्या भारतीय संघाचा भाग होती. एमआयमध्ये डब्ल्यूपीएलसाठी खेळातील दिग्गजांसोबत उभे राहण्याची संधी मिळाल्याने तिचा खेळ आणखी बहरेल. लक्षात ठेवा, तिचे वय १६ सुद्धा नाहीये.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता