{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
आकाशाला गवसणी घालणारा आपला स्कायदादा खरोखर सूर्यासारखा तळपतोय. त्याला आयसीसी टी२०आय क्रिकेटर ऑफ दि इयर २०२२ म्हणून गौरवण्यात आले आहे.
मागील काही वर्षांमध्ये त्याने खरोखर सफेद चेंडूच्या फलंदाजीचे एक नवीन रूप सर्वांना दाखवले आहे. त्याने खेळलेले शॉट्स क्रिकेटच्या इतिहासात यादगार बनून राहतील. चेंबूरमध्ये राहणारा हा तरूण मुलगा स्थानिक क्लब्ससाठी (पारसी जिमखाना, दादर युनियन) खेळत असताना आपल्या कौशल्यांना पैलू पाडतो आणि त्यानंतर तो थेट आयपीएलच्या मैदानात उतरतो. तो २०११ मध्ये एमआयसाठी खेळला. त्याने त्याच वर्षात आपल्यासाठी चॅम्पियन्स लीग टी२० जिंकण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर २०१४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी खेळू लागला. तिथे त्याने फिनिशर म्हणून आपले स्थान प्रस्थापित केले.
२०१८ मध्ये आपण आपल्या लाडक्या खेळाडूला परत आणले. तेव्हापासून आपला दादा सूर्याचा जयघोष थांबलाच नाही. फलंदाजीच्या क्रमात पहिल्या क्रमांकावर तो आला. त्याने तेव्हापासून प्रत्येक आयपीएल सीझनमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा कुटल्या आहेत. त्यामुळे तो असा तसा खेळाडू नाहीये. त्याने मी आहे ना... असं सांगत आरसीबीविरूद्ध धावांच्या पाठलागात नाबाद ७३ (४३) फटकावून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले होते.