ख्रिस
ख्रिस
जॉर्डन
जॉर्डन
जन्मतारीख
ऑक्टोबर 4, 1988
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट आर्म फ़ास्ट मीडियम
प्रोफाइल
माहिती
ख्रिस बाबत

घातक यॉर्कर आणि निर्विवाद अचूकता यांचे वरदान लाभलेला ख्रिस जॉर्डन हा क्रिकेट जगतातील फलंदाजांच्या छातीत धडकी भरवणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. डेथ ओव्हर्समध्ये तूफान फटकेबाजी करण्याची गरज असेल तर तुम्ही त्याच्यावर विसंबून राहू शकता. आणि हो, आपला हा लाडका एमआय खेळाडू एकेकाळी ख्यातनाम गायिका रिहानाच्या वर्गात होता हे तुम्हाला माहीत आहे का?

बार्बाडोसमध्ये जन्मलेला ख्रिस इंग्लंडला डलविच कॉलेजमधून खेळाशी संबंधित शिष्यवृत्ती मिळवून स्थलांतरित झाला. त्यानंतर लवकरच या जलदगती गोलंदाजाने देशांतर्गत स्तरावर आपला खेळ दाखवायला सुरूवात केली. त्याचे आजीआजोबा ब्रिटिश नागरिक होते. त्यामुळे तो वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन्ही देशांसाठी खेळायला पात्र ठरला आणि त्याने इंग्लंडची निवड केली. २०१३ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यापासून तो इंग्लंडच्या टीमचा आणि विशेषतः टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अविभाज्य भाग राहिला आहे. तो या स्वरूपात देशाचा सर्वाधिक विकेट घेणाराही खेळाडू ठरलाय. तो २०२२ च्या टी२० वर्ल्डकप विजेत्या संघातही होता.

फ्रँचायझी क्रिकेटमध्ये मागच्या दशकभराच्या कालावधीत सर्वाधिक मागणी असलेल्या अष्टपैलू खेळाडूंपैकी तो एक आहे. आरसीबीसाठी २०१६ मध्ये पहिला सामना खेळल्यानंतर तो एसआरएच, पीबीकेएस आणि सीएसकेसाठी खेळला आहे आणि त्याने २८ सामन्यांमध्ये २७ विकेट्स घेतल्या आहेत. तो २०२३ सीझनच्या शेवटच्या टप्प्यासाठी आपल्यासोबत खेळणार असून संघात बार्बाडोसच्याच जोफ्रा आर्चरऐवजी तो दिसेल.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता