{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
जेसन बेहरेनडॉर्फ हा नवीन चेंडूचा स्पेशालिस्ट आहे. तो आता एमआयमध्ये परत आलाय आणि आपला वारसा पुढे न्यायला सज्ज आहे. त्याने आपला पहिला टी२० सामना २०१२ मध्ये खेळला. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने २०१३-१४ मध्ये नऊ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या. त्यानंतरच्या वर्षात त्याने १५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला वर्षातील सर्वोत्तम देशांतर्गत खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आणि त्याने पर्थ स्कॉर्चर्सच्या एकामागून एक बीबीएल विजयांमध्येही मोठी भूमिका बजावली.
त्याने आपल्यासाठी २०१९ सीझनमध्ये पाच आयपीएल सामने खेळले. त्यात सीएसके विरूद्ध २२ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. २०२१ मध्ये सीएसकेने त्याला एक बदली खेळाडू म्हणून घेतले आणि २०२२ मध्ये तो आरसीबीच्या संघात होता. परंतु त्याला एकही सामना खेळायची संधी मिळाली नाही. त्यामुळे जेसन बेहरेनडॉर्फने फक्त ब्लू आणि गोल्डमध्ये सामने खेळले आहेत असे म्हणता येईल. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधून तो लिलावपूर्व खरेदीच्या स्वरूपात आपल्याकडे आला आहे. आता हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आमची मुंबईमध्ये अविस्मरणीय आठवणी निर्माण करेल.