{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
एक खरा मुंबईकर असलेला लॉर्ड शार्दुल ठाकूर आता आयपीएल २०२६ साठी मुंबई इंडियन्सचा ब्लू अँड गोल्ड परिधान करणार असून त्याचा स्वॅग आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे.
बॅट आणि बॉलने सामने स्विंग करण्याच्या आपल्या क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शार्दुलने एक शक्तिशाली अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वतःचे स्थान प्रस्थापित केले आहे.
त्याने १०५ आयपीएल सामन्यांमध्ये १०७ विकेट्स घेतल्या आहेत आणि कठीण परिस्थितीत उत्तम कामगिरी करण्याची त्याची क्षमता सर्वांची आवडती आहे. सुंदर गोलंदाजी करून दणकट भागीदारी मोडणे असो वा डेथ ओव्हर्समध्ये पटापट धावा करणे असो, गरज असते तेव्हा तो असतोच. त्याला तणावाखाली उत्तम कामगिरी करायला आवडते. भारतासाठी त्याने अनेकदा महत्त्वाची कामगिरी केली असून गब्बामधील विजय आणि ओव्हलवर २०२१ मधील विजयात त्याचा सहभाग खूप मोलाचा ठरला.
अत्यंत हुशारीने बदल करणे, अजिंक्य आत्मविश्वास आणि कधीही हार न मानण्याचा दृष्टीकोन यांच्यामुळे शार्दुल एमआयसाठी एक सखोल कामगिरी, संतुलन आणि उत्साह घेऊन लाय. वानखेडेच्या चाहत्यांना मस्त मनोरंजन मिळेल कारण आपला छोकरा घरी परतलाय!