संदीप
संदीप
वॉरियर
वॉरियर
जन्मतारीख
एप्रिल 4, 1991
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट आर्म मीडियम
प्रोफाइल
माहिती
संदीप बाबत

वेग? खूपच जास्त. विकेट्स? मैदानावर तो तेच तर करतो. आणि वॉरियर? बस्स नाम ही काफी है.

संदीप वॉरियरची गोलंदाजी आणि त्याचे ऑफ कटर्स यांच्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्याने २०१८-१९ च्या रणजी ट्रॉफीमध्ये बंगालविरूद्ध ३३ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. त्या सामन्यात त्याने १२ विकेट्स घेतल्यामुळे केरळला पहिल्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचता आले. त्याने या देशांतर्गत सीझनमध्ये फक्त १० सामन्यांत ४४ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर काय झाले? तो कोलकाता नाइट रायडर्ससोबत खेळू लागला (२०१९-२१ दोन विकेट्स), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत (२०१३-१५) खेळल्यानंतर चार वर्षांनी त्याने २०१९ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात हॅटट्रिक केली (आंध्र प्रदेशविरूद्ध), त्यानंतर तामिळनाडूसाठी खेळला (२०२१- आतापर्यंत) आणि त्यानंतर भारताच्या ‘ए’ आणि वरिष्ठ संघात तो आला. नेट्समध्ये त्याने केलेल्या मेहनतीचे फळ त्याला श्रीलंकेविरूद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात (२०२१) खेळायच्या संधीच्या स्वरूपात मिळाले.

त्याने टी२० मध्ये ६२ विकेट्स घेतल्या आहेत, पलटन! आपल्या बूम जसप्रीत बुमराच्या जागी खेळायला आलेल्या वॉरियरची कमाल पाहायला तयार राहा. आपल्या गोलंदाजीने तो प्रतिस्पर्ध्यांना चितपट करेल आणि कदाचित एमआयसाठी सहाव्या आयपीएल ट्रॉफीचा मार्गही खुला करेल.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता