Jofra
Jofra
Archer
Archer
जन्मतारीख
एप्रिल 1, 1995
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
Jofra बाबत

खालच्या फळीतला जोरदार फटकेबाजी करणारा फलंदाज, एक उत्तम क्षेत्ररक्षक, कौशल्यपूर्ण गोलंदाज आणि ट्विटरचा बादशहा. जोफ्रा आर्चर खऱ्या अर्थाने एक मनोरंजनाचे पूर्ण पॅकेज आहे.

बार्बाडोसमध्ये जन्मलेला आणि तिथेच मोठा झालेला आर्चर २०१३-१४ मध्ये वेस्ट इंडिजच्या १९ वर्षांखालील टीमसाठी खेळला. त्यानंतर तो इंग्लंडसाठी खेळण्यासाठी ससेक्सला गेला. वयाच्या २४ व्या वर्षी तो इतका प्रगल्भ खेळाडू होता आणि त्याची प्रतिमा इतकी उंचावलेली होती की ईसीबीने इंग्लंडसाठी पात्र ठरण्यासाठी त्याचा प्रतीक्षा कालावधी चार वर्षांनी कमी केला. त्यानंतर त्याने वर्ल्ड कप मेडल जिंकले. अंतिम फेरीत अत्यंत देखणी सुपर ओव्हर खेळली. त्याने आपल्या कसोटी करियरची सुंदर सुरूवात करून फ्रँचायझी क्रिकेटमध्ये संपूर्ण जगभरात ख्याती कमावली.

२०१८-२१ या कालावधीत राजस्थान रॉयल्ससोबत खेळताना तो २०२० मध्ये आयपीएलचा एमव्हीपी होता. २०२२ सीझनमध्ये तो उपलब्ध नसतानाही आपण त्याला जोरदार बोलीयुद्ध करून आपल्याकडे आणले. हो, कारण जोफ्रा आर्चर... हे नावच पुरेसे आहे!

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता