ईशान
ईशान
किशन
किशन
जन्मतारीख
जुलै 18, 1998
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
ईशान बाबत

आपला पॉकेट डायनॅमो! २०१९ मध्ये ईडन गार्डनमध्ये त्याने फटकावलेले सलग चार षटकार असोत किंवा २०२० मध्ये दुबईत केलेल्या ९९ धावा किंवा त्याचे डान्सिंग रील्स किंवा तो महान सचिन तेंडुलकरसमोर एकदम स्तब्ध झालेला क्षण असो. मैदानावर आणि मैदानाबाहेरही ईशान किशन मनोरंजनाचे पूर्ण पॅकेज आहे.

२०१६ मध्ये भारताचा १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार असलेल्या ईशानला आधी गुजरात लायन्सने साइन केले. २०१७ च्या सीझनमध्ये त्याने १३४.४६ च्या स्ट्राइक रेटने २७७ धावा केल्या आणि सर्वांना थक्क केले. आपण त्याला तो १९ वर्षांचा असताना २०१८ मध्ये आपल्याकडे आणले आणि २०२० च्या सीझनमध्ये त्याच्या ५७.३३ च्या सरासरीने ५१६ धावा आपल्या विजयासाठी खूप महत्त्वाच्या ठरल्या. २०२२ मध्ये तो मेगा लिलावात सर्वांत महागडी खरेदी ठरला. आणि त्याला खरेदी कोणी केले? अर्थातच आपण!

आपल्या स्फोटक शैलीला साजेसा खेळ करत त्याने टी२०आय क्रिकेटमधल्या पहिल्याच चेंडूवर चौकार तर ओडीआय क्रिकेटच्या पहिल्याच चेंडूवर षटकार फटकावला. आणि आता आयपीएल २०२४ सुरू होत असताना ईशान आपल्या फटकेबाजी, स्टंप्सच्या मागे उभे राहून प्रतिस्पर्ध्याला बाद करण्याची क्षमता तसेच त्याला खराखुरा पॉवरपॅक्ड मनोरंजक बनवणारे अँड्रेनलाइन रश या सगळ्यांसोबत मैदानात उतरेल तेव्हा मजा येईल.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता