{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
त्याने केपटाऊनवर राज्य केले आणि नंतर मुंबईत चमकण्यासाठी तो एमआयच्या जगात आला. मुंबई इंडियन्सच्या गौरवशाली इतिहासात वरच्या फळीत फलंदाजी करणारा यष्टीरक्षक नेहमीच एक उत्तम खेळाडू ठरला आहे आणि रिकल्टन दादांनी ही परंपरा पुढे चालू ठेवलीय!
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावानंतरच्या एका काळात त्याने कसोटीत द्विशतक आणि एक शतक ठोकले आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अफगाणिस्तानविरुद्ध सलामीच्या सामन्यात १०३ धावांची अविश्वसनीय खेळी केली.
पण तो तिथेच थांबला नाही. रायनने २०२५ मध्ये एमआय केपटाऊनला पहिला एसए२० चषक मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ४८ च्या सरासरीने आठ इनिंग्समध्ये ३३६ धावा फटकावल्या.
आयपीएलमध्ये त्याने आपल्या खेळाची चुणूक सर्वांना दाखवली. त्याने आपल्या प्रतिष्ठेनुसार खेळ करताना १४ सामन्यांमध्ये ३८८ धावा केल्या. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश होता आणि स्टंपच्या मागेही तो अक्षरशः पहाडासारखा उभा आहे. भारीच रे, रायन!
*आयपीएल २०२५ प्लेऑफ्ससाठी रायन रिकल्टनऐवजी रिचर्ड ग्लीसन आला आहे.