जाय
जाय
रिचर्डसन
रिचर्डसन
जन्मतारीख
सप्टेंबर 20, 1996
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
जाय बाबत

झाये रिचर्ड्सनची उंची ५ फूट ११ इंच आणि अत्यंत राकट चेहरा असलेला आहे. त्यामुळे तो चेहऱ्यावरून आपल्या नेहमीच्या जलदगती गोलंदाजांसारखा वाटत नाही. पण त्याला कमी समजण्याची चूक करू नका. तो अत्यंत वेगवान, चित्त्यासारखा चपळ आहे आणि १४० किमी वेगाने सहज गोलंदाजी करू शकतो आणि त्याचवेळी दोन्ही बाजूंनी चेंडू फिरवूही शकतो.

२० ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये त्याचा पहिला ठसा उमटला तो २०१६-१७ च्या बिग बॅश लीगमध्ये. तिथे त्याने ११ विकेट्स घेतल्या. त्यात अंतिम फेरीतल्या ३/३० विकेट्स होत्या आणि त्यामुळे पर्थ स्कॉर्चर्सला विजय मिळवता आला. २०२३ च्या बीबीएल सीझनमध्ये त्याने करियरमधली सर्वोत्तम कामगिरी केली. आपल्या टाचेच्या दुखापतीतून बरे होत असताना सिडनी सिक्सर्सच्या फलंदाजीचा सुपडा साफ करत ४/९ विकेट्स घेतल्या.

तो आयपीएलमध्ये २०२१ च्या सीझनमध्ये किंग्स ११ पंजाबसाठी प्रथम खेळला. आता २०२३ मध्ये आपल्या खास ब्लू आणि गोल्डमध्ये त्याला पाहायला आम्ही उत्सुक आहोत.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता