{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
राजस्थानचा देशांतर्गत क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू, महिपाल लोमरोर, सर्व फॉरमॅटमधील अनुभवाचा दांडगा साठा घेऊन संघात सामील झाला आहे. २०१६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत तो आपल्या आकर्षक फटकेबाजीने आणि चतुर डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने प्रकाशझोतात आला. मुंबई इंडियन्समध्ये आम्हाला आमचे डावखुरे खेळाडू खूप आवडतात, नाही का! #OneFamily मध्ये तुमचे स्वागत आहे, लोमरोर दादा!
* दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयपीएल २०२६ मधून बाहेर पडलेल्या क्विंटन डी कॉकच्या जागी महिपाल लोमरोरला संघात स्थान मिळाले आहे.