Riley
Riley
Meredith
Meredith
जन्मतारीख
जून 21, 1996
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
Riley बाबत

प्रचंड वेग आणि धोकादायक बाऊन्सर आपल्या भात्यात घेऊन फिरणारा रायली मेरेडिथ. टास्मानियाचा हा अतिजलदगती गोलंदाज झाये रिचर्डसन दुखापतग्रस्त होऊन या वर्षीच्या आयपीएलमधून बाहेर पडल्यामुळे आपल्याकडे परत आला आहे. त्याने बीबीएलच्या २०२२-२३ सीझनमध्ये नेत्रदीपक कामगिरी करताना १४ सामन्यांमध्ये २१ विकेट्स घेतल्यात. तो या लीगचा पाचव्या क्रमांकाचा विकेट घेणारा खेळाडू ठरलाय.

रायलीने २०२१ मध्ये न्यूझीलंडविरूद्ध टी२०आयसाठी पहिला सामना खेळला आणि तेव्हापासून तो ऑस्ट्रेलियन टीममध्ये आणि बाहेर अशा प्रकारे आहे. वयाच्या २६ व्या वर्षी त्याचा तिखटजाळ फॉर्म अनेकांना झणझणीत लागणार आहे. वानखेडेच्या उसळी मारणाऱ्या आणि संथ खेळपट्टीवर त्याच्या गोलंदाजीमुळे अरबी समुद्राचं खारं वारं खाण्यासाठी फलंदाजांची रांग लागू शकते.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता