{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
फलंदाजांना चकवण्याची क्षमता असलेला एक अप्रतिम लेग स्पिनर मयंक मार्कंडे आपल्या मूळच्या संघात परतला आहे.
आपल्या गोलंदाजीत अचानकपणे बदलांसाठी, अत्यंत हुशारीने लढा देण्यासाठी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीसाठी मयंक ओळखला जातो आणि तो खऱ्या अर्थाने कलाकार आहे. तो भल्या भल्या फलंदाजानाही आपला पुढचा चेंडू काय असेल याची कल्पना येऊ देत नाही.
तो आयपीएल 2018 मध्ये संघात आला आणि वानखेडेवर सीएसकेविरूद्ध 3/23 ची कामगिरी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने याच सामन्यात आपल्या आगमनाची दिमाखदार घोषणा केली. तेव्हापासून तो एक विश्वासू विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे आणि मधल्या फळीत प्रतिस्पर्धी संघासाठी घातक ठरला आहे.
आता मयंक आपल्या घरी परतला आहे. तो आपल्यासोबत तीच जादू आणि कमाल घेऊन आलाय. वानखेडेला पुन्हा एकदा जादू होईल अशी अपेक्षा आहे.