नेहल
नेहल
वढेरा
वढेरा
जन्मतारीख
सप्टेंबर 4, 2000
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
नेहल बाबत

विशेषत: मधल्या फळीतील फलंदाजी आणि मधल्या षटकांमध्ये सर्व तोफांचा मारा करण्याची क्षमता यामुळे त्याने ‘नव्या काळातील युवराज सिंग’ ची उपाधी मिळवली आहे

नेहल वधेराच्या टॅलेंटची पहिली झलक २०१८ च्या यू-१९ कूच बिहार ट्रॉफीमध्ये दिसली. तिथे त्याने सहा अर्धशतके फटकावली. त्यानंतर त्याने यू-१९ भारतीय संघात श्रीलंकेविरूद्ध ८१ धावा केल्या आणि २०२२ च्या पंजाब स्टेट आंतर जिल्हा स्पर्धेत यू-२३ मध्ये भटिंडाविरूद्ध ५७८ धावा कुटल्या. २०२३ च्या आयपीएल लिलावात त्याला खरेदी करण्याचा आनंद म्हणून की काय या पंजाबी पुत्तरने २०२२-२३ सीझनमध्ये गुजरातविरूद्ध रणजीच्या पहिल्या सामन्यात शतक (१२३ धावा) फटकावले आणि त्यानंतर २०२२-२४ या सीझनमध्ये त्याने मध्य प्रदेशविरूद्ध द्विशतक (२१४) पूर्ण केले.

या प्रिन्स ऑफ लुधियानाने पहिल्याच सीझनमध्ये (२०२३) २४१ धावा खात्यात नोंदवल्या आहेत. त्यामुळे तो आगामी २०२४ सीझनमध्ये एमआयसाठी परफेक्ट क्लच प्लेयर ठरू शकतो.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता