कुमार
कुमार
कार्तिकेय
कार्तिकेय
जन्मतारीख
डिसेंबर 26, 1997
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
कुमार बाबत

‘मी स्वतःला एक मिस्टरी स्पिनर म्हणतो’ – कुमार कार्तिकेयला तू स्वतःबद्दल काय विचार करतोस असे विचारल्यावर त्याने हे उत्तर दिले. तो आयपीएलच्या २०२२ च्या सीझनमध्ये प्रसिद्ध झाला. एमआयचा संघ सलग आठ सामने हरत असताना त्यातून बाहेर काढण्यात त्याने महत्त्वाचा वाटा उचलला.

हा २५ वर्षीय डावखुरा स्पिनर पारंपरिक गोलंदाजी करू शकतो आणि मनगटाने स्पिनदेखील करू शकतो. त्याने राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅम्सनला बाद करून आयपीएलमध्ये प्रवेश केला. आपल्याकडे नेट गोलंदाज म्हणून तो खेळत होता आणि त्यानंतर दुखापतग्रस्त अर्शद खानच्या बदली खेळाडू म्हणून त्याला आपल्याकडे साइन करण्यात आले आणि अगदी काही दिवसांत तो ११ च्या संघातही आला.

त्याच्या टी२० रेकॉर्डमध्ये त्याने ३१ सामन्यांमध्ये ३२ विकेट्स घेतल्याचे दिसते. कार्तिकेय हा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशच्या संघासाठी एका जादूसारखा ठरला आगे (३२ सामन्यांमध्ये १४० विकेट्स). त्याने रणजी ट्रॉफी २०२२ जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांना २०२३ व २०२४ मध्ये उपांत्य फेरीपर्यंत नेले आहे.

आता आयपीएल २०२४ मध्ये केके पियूष चावला आणि श्रेयस गोपाल यांच्यासोबत खास भागीदारी करून स्पिन गोलंदाजीचे जादुई स्वरूप सर्वांना दाखवेल अशी अपेक्षा आहे

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता