डुआन
डुआन
जेन्सेन
जेन्सेन
जन्मतारीख
मे 1, 2000
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट आर्म फ़ास्ट
प्रोफाइल
माहिती
डुआन बाबत

डावखुरा जलदगती. हो. विकेट्स. हो. फलंदाजी करू शकतो का? हो. जिथे कमी तिथे डुआन जेन्सन.

त्याची उंचीच आहे ६ फूट ८ इंच आणणि त्याचा हात उंचावरून खाली येतो तेव्हा तो १४० किमीच्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. डुआन जॅन्सन हा दक्षिण आफ्रिकेची आशा असलेला सर्वांत उज्ज्वल भविष्य असलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या या टॅलेंटमुळे त्याला २०२२ मध्ये सीपीएल काँट्रॅक्ट मिळाले आणि सिक्स्टी टूर्नामेंटमध्ये त्याने भरभरून विकेट्स घेत त्याच्या संघाला विजय मिळवायला मदत केली.

भारतीय कसोटी क्रिकेट संघ २०१७-१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आला तेव्हा डुआन जेन्सनसाठी हा अत्यंत आत्मविश्वास वाढवणारा आणि आनंददायी काळ ठरला. त्याला मार्को या त्याच्या जुळ्या भावासोबत नेट गोलंदाजीत विराट कोहलीला गोलंदाजी करण्यासाठी बोलावले गेले तेव्हा त्याने विराटचे लक्ष वेधून घेतले आणि “वेल बॉल्ड” असे कौतुकही मिळवले.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता