{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
दिल्लीच्या श्वेता सेहरावतने मार्च २०२१ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तर एप्रिल २०२२ मध्ये ती पहिल्यांदा महिला टी२० क्रिकेटमध्ये खेळली. त्यानंतर मणिपूरविरुद्ध ४३ चेंडूंमध्ये ६० धावांची खेळी साकारत तिने महिला टी२० क्रिकेटमधील आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं. महिला अंडर-१९ चॅलेंजर ट्रॉफीमध्ये तिने इंडिया बी संघाचं नेतृत्व करत संघाला विजेतेपदही मिळवून दिलं. या स्पर्धेत १६३ धावा करत ती सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली होती. एकदा श्वेताची बॅट तळपायला लागली की धावांचा वेग झपाट्याने वाढतो. आक्रमक फलंदाजी, क्षेत्ररक्षकांमधील मोकळ्या जागा अचूक हेरण्याचं कौशल्य आणि धावफलक सतत हलता ठेवण्याची हातोटी ही तिच्या खेळाची खास वैशिष्ट्यं आहेत.
सलामीला फलंदाजी करताना श्वेता कोणत्याही गोलंदाजाचा सामना आत्मविश्वासाने करते. चेंडूवर अचूक प्रहार करण्याचं कौशल्य आणि निडर वृत्ती यांच्या जोरावर ती गोलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकते. WPL च्या पहिल्या हंगामापासून ती प्रत्येक हंगामात खेळली आहे. दिल्ली प्रीमियर लीगमध्येही तिने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २०२५ मध्ये श्वेताने साऊथ दिल्ली सुपरस्टार्झ संघाचं नेतृत्व करत संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्यानंतर २०२६ मध्ये तिला या स्पर्धेतील हंगामाचा 'एस सुपरस्ट्रायकर' पुरस्कार मिळाला. पलटन, सज्ज व्हा! कारण चौकार-षटकारांची आतषबाजी करण्यासाठी आता आपला 'एस फॅक्टर' दाखल झाला आहे.