{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
मुंबईची राजकुमारी सानिका चाळके आता मुंबई इंडियन्सच्या निळ्या-सोनेरी रंगांत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. स्वप्ननगरी मुंबईतून पुढे आलेल्या या युवा प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूला आता आपलं कौशल्य दाखवण्याची आणि यशाची नवी शिखरं गाठण्याची संधी मिळाली आहे. मुंबईच्या स्पर्धात्मक क्रिकेटविश्वात आपला खेळ घडवत आणि विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये सातत्याने प्रगती करत सानिकाने इथपर्यंत मजल मारली आहे. आता मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करण्यासाठी ती उत्सुक असेल. कोणत्याही मुंबईकरासाठी MI चा लोगो असलेली जर्सी घालणं ही एक खास भावनिक गोष्ट असते. सानिकाही या भावनेला मैदानावरील दमदार कामगिरीची जोड देण्यासाठी नक्कीच उत्सुक असेल. पलटन, आपल्या या मुंबईच्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया. कारण ती आता मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली आहे!