{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
विदर्भाची यष्टिरक्षक-फलंदाज लतिका इनामदार ही देशांतर्गत क्रिकेटमधील उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत आपल्या खेळाला पुढच्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी ती उत्सुक आहे. यष्ट्यांमागे तिची चपळाई आणि चेंडू टिपण्याचं कौशल्य तिला संघातील एक्स फॅक्टर बनवतं. दबावाच्या क्षणी जबाबदारी स्वीकारून चांगली कामगिरी करणं, हेच तिचं ध्येय आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात मिळालेल्या या नव्या संधीमुळे लतिकाला अनुभवी खेळाडूंकडून बरंच काही शिकता येणार आहे. आपली कौशल्यं आणखी विकसित करत प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी ती सज्ज असेल. निळ्या-सोनेरी रंगांत तिच्या नव्या प्रवासाला आता सुरुवात होत आहे. लतिका, #OneFamily मध्ये तुझं मनापासून स्वागत!