डेवाल्ड
डेवाल्ड
ब्रेव्हिस
ब्रेव्हिस
जन्मतारीख
एप्रिल 29, 2003
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेग ब्रेक
प्रोफाइल
माहिती
डेवाल्ड बाबत

बटर चिकनवर मनापासून प्रेम करणारा डेवाल्ड ब्रेविस २०२२ मध्ये आपल्याकडे आला आणि त्यापूर्वी त्याने १९ वर्षे वयाखालील विश्वचषक स्पर्धेत ५०६ धावा फटकावल्या. या धावांपेक्षा जास्त त्याची शैली लोकांना भावली. त्याने लाँग ऑनवर वळून न बघता मारलेला षटकार तर खूप लोकांच्या मनात बसलाय. विश्वास नसेल तर सूर्यकुमार यादवला विचारा.

ब्रेविसची गोलंदाजी फोडून काढण्याची क्षमता मागील एमआय सीझनमध्ये दिसली. त्याने केकेआरविरूद्ध पहिल्याच सामन्यात १९ चेंडूंमध्ये २९ धावा तर पीबीकेएसविरूद्ध २५ चेंडूंमध्ये ४९ धावा (चार चौकार, पाच षटकार) फटकावल्या. पण तो तर फक्त एक ट्रेलर होता. त्यानंतर झालेल्या सीएसए टी२० सामन्यात त्याने: १६२ धावा | ५७ चेंडू| १३ चौकार| १३ षटकार असा खेळ दाखवला तेव्हा संपूर्ण स्टेडियम आ वासून उभे होते. तरीही अजून फार काही पाहिलेलेच नाहीये.

पिक्चर अभी बाकी है दोस्त... आणि आम्ही वाट पाहतोय.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता