एमआई जूनियर बद्दल
एमआय ज्युनियर ही इंटर स्कूल क्रिकेट टूर्नामेंट आहे. एमआय ज्युनियरचा पहिला सामना फेब्रुवारी २०१९ मध्ये मुंबईत खेळला गेला होता. यात ५० पेक्षा अधिक शाळांनी - यू-१४ बॉइज आणि यू-१६ मुली या दोन श्रेणींमध्ये भाग घेतला होता. रिझवी स्प्रिंगफील्ड (अंडर-१४ बॉइज) आणि शारदाश्रम विद्यामंदिर (अंडर १६ गर्ल्स) या स्पर्धेचे पहिले चॅम्पियन्स झाले. इथे प्रत्येक कॅटेगरीच्या फायनलिस्टना मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफसोबत प्रशिक्षण देण्यात आले. एमआय ज्युनियरचे उद्दिष्ट मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर इच्छुक क्रिकेटपटूंना (मुली आणि मुले) स्पर्धात्मक क्रिकेट पाहणे आणि अनुभव यांची ओळख करून देण्याचे आहे.