News

२४ फेब्रुवारी २०१०: भारताकडून २०० धावा करणारा पहिला खेळाडू. आपला लाडका सुपरमॅन

By Mumbai Indians

मुंबईतलं गल्ली क्रिकेट खुन्नसवर चालतं असं म्हणतात. कधीही हार न मानण्याचा चिवटपणा, जिद्द. मागच्या सुमारे १३ वर्षांत जगाला १९४ धावा म्हणजे डोक्यावरून पाणी असं वाटायच्या. पण मुंबईच्या रस्त्यांवरचा एक खेळाडू आला आणि त्याने चित्र पालटलं. 

सईद अन्वरने भारताविरूद्ध १९९७ साली १९४ धावांचा टप्पा ठेवला होता. मागच्या दशकभरापासून क्रिकेटच्या दैवताने ही मर्यादा पार केलेली नव्हती.

नंतर आपण अनेक खेळाडूंनी हा टप्पा पार करण्याचा प्रयत्न करताना पाहिलं. परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. सर विव रिचर्ड्स, गॅरी कर्स्टन आणि सनथ जयसूर्या या सर्वांनी ते आव्हान पेलायचा प्रयत्न केला. २००९ मध्ये झिम्बाब्वेच्या चार्ल्स कॉवेंट्रीने १९४ धावा केल्या. पण त्याला पुढे जाता आलं नाही. हा टप्पा एखाद्या चकव्यासारखा अडकून बसला होता. ५० ओव्हर्समध्ये कोणालाही द्विशतक करता येणार नाही सं वाटत होतं.

परंतु २४ फेब्रुवारी २०१० हा दिवस आला आणि संपूर्ण चित्र पालटलं.

शेवटी चकवा तुटलाच

ग्वाल्हेमधल्या कॅप्टन रूपसिंग स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेकडून डेल स्टिनचा हल्ला परतवताना सचिन तेंडुलकरने अशक्य हा शक्य आपल्या डिक्शनरीत नाही असं ठरवलंच होतं. वयाच्या ३६ व्या वर्षी जेव्हा बरेचसे खेळाडू निवृत्तीच्या वाटेवर असतात तेव्हा मास्टर ब्लास्टर हे कवच भेदायचं ठरवून मैदानात उतरला होता.  

त्याच्या पहिल्या १०० धावा क्लासिक सचिन स्टाइलच्या होत्या. त्याने ९० चेंडूंमध्ये अत्यंत संयमी, अचूक खेळ करून हे साध्य केलं. पण नंतरच्या १०० धावा... त्या अक्षरशः अविश्वसनीय होत्या. त्याने ५७ चेंडूंमध्ये खुन्नस काढावी तशा या धावा पार केल्या.

सचिन १९० धावांपर्यंत पोहोचला तेव्हा ग्वाल्हेर स्टेडियमच्या गर्दीने आपल्या हाताची नखं खाऊन दुसऱ्यांच्याही हाताची नखं खाऊन टाकली होती. तो हा विक्रम करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. त्याच्या खांद्यावर हा मोठा ताण असल्यासारखं वाटत होतं.

पण सचिनने १४७ चेंडूंमध्ये २०० नाबाद धावा करताना चार्ल लाँगवेल्डच्या यॉर्करला टोलवलं आणि कॉमेंट्रीमध्ये वाक्य उमटलं, "२०० धावा करणारा पृथ्वीवरचा पहिला माणूस...यावेळी फक्त विक्रम मोडीत निघाला नाही तर एका मानवाने मानसिक चकवा मोडून काढला आणि अशक्य हा शब्द आपल्या डिक्शनरीत नाही हे सिद्ध केलं.

हा क्षण आपल्या हृदयात अजूनही कोरलेला आहे. हो ना पलटन?

तो "खडूस" डीएनए: सचिनकडून जगाकडे

सचिनच्या नाबात २०० धावा फक्त जागतिक विक्रम नव्हता तर ती एक घोषणा होती. ब्लू अँड गोल्ड परिधान करणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या रक्तात फेब २४ फायर आहे हे त्याने जाहीर केलं. एमाय मेंटॅलिटीबाबत पलटनला विचारा आणि ते तुम्हाला फक्त विजयाची नाही तर तणावाखालीही वर्चस्व कसं गाजवायचं याची गोष्ट सांगतील.

आपण हे वारंवार पाहिलं आहे. २०१२ मध्ये ईडन गार्डन्सवर रोहितच्या १०९ धावा असतील किंवा गुजरातविरूद्ध स्कायने केलेल्या नाबाद १०३ धावा असोत. हे सर्व फक्त स्ट्राइक रेटशी संबंधित नाही तर सामना बुडण्यापासून वाचवून विजयापर्यंत नेण्याची ही जिद्द आहे.

सचिननंतर नऊ खेळाडूंनी २०० चा टप्पा पार केला. परंतु मास्टर ब्लास्टरचा ब्लू प्रिंट घेऊन अनेकदा हा टप्पा पार करायला खूप जिगर लागते. ही बॅटन फक्त पुढे गेलेली नाही तर ती ओढून घेतलेली आहे. रोहितने मुंबईच्या एका महान खेळाडूकडून नो लिमिट्सचा मंत्र घेतला आणि स्वतःच्या मालकीचे मैदान असल्यासारखा तो वापरला.

२४ फेब्रुवारी हा दिवस ज्या दिवशी अशक्य हा शब्द निवृत्त झाला. तुम्हाला आकाशाला गवसणी घालायची असेल तर विक्रम फक्त तुमचे मैलाचे टप्पे असतात. बस्स, एकदा ठरवलं ना तर करायचं. 😤