News

मुंबई इंडियन्सच्या संघात सूर्यकुमार यादवच्या जागी आकाश मधवाल खेळणार

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवच्या जागेवर आकाश मधवाल याला साइन केले आहे. 

आकाश मधवाल हा मुंबई इंडियन्समध्ये सपोर्ट टीमचा भाग म्हणून होता आणि त्याला २०२२ च्या सीझनसाठी संघात सहभागी करून घेण्यात आले आहे. 

आकाश मधवाल हा उजव्या हाताने खेळणारा मध्यम जलदगती गोलंदाज आहे आणि त्याने २०१९ मध्ये पहिला सामना खेळल्यापासून क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडचे खेळाच्या तिन्ही प्रकारांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. 

आकाशची एमआयच्या सीझनपूर्व शिबिरात सपोर्ट टीमचा भाग म्हणून निवड करण्यात आली होती आणि मागील काही महिन्यात त्याने गोलंदाजीत आपली क्षमता सिद्ध केल्यामुळे या सीझनमध्ये त्याला संघात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.