
आशिया कप २०२५, INDvPAK: भारताचा विक्रमी विजय, सलग दोन विजय नावावर
भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप २०२५ मध्ये सलग दुसरा विजय नावावर केला असून ग्रुप ए स्पर्धेत पाकिस्तानविरूद्ध अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना विजयी होता आले.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया:
एमआय कनेक्शन = प्रारंभीच दबाव
➡️ ०.१ – सईम अयूब (𝕔 जसप्रीत बुमराह 𝕓 हार्दिक पांड्या)
➡️ १.२ – मोहम्मद हॅरिस (𝕔 हार्दिक पांड्या 𝕓 जसप्रीत बुमराह)
आपल्या पोरांनी प्रतिस्पर्धी संघाला पहिल्याच दोन ओव्हरमध्ये २/६ वर रोखून टीम इंडियाला उत्तम सुरूवात करून दिली. पॉवर प्लेच्या शेवटी त्यांच्या स्कोअरबोर्डवर २/४२ अशी धावसंख्या होती.
मग स्पिनर्सची एंट्री
संपूर्ण इनिंगमध्ये धडपडत खेळणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजांना जराही दिलासा मिळाला नाही.
कुलदीप यादव (३/१८), अक्षर पटेल (२/१८) आणि वरूण चक्रवर्ती (१/२४) या तीन स्पिनर्सनी प्लॅन अगदी सहजपणे पार पाडला.
पाकिस्तान २० ओव्हर्समध्ये १२७/९ वर थांबला.
आमचा लाडका अभिषेक शर्मा!
आपल्या संघासमोर १२८ धावांचे आव्हान असताना त्याने भारताला एक दणदणीत सुरूवात करून दिली. त्याने चार चौकार आणि दोन षट्कारांच्या मदतीने फक्त १३ चेंडूंमध्ये ३१ धावा फटकावल्या. किती मस्त ना!
सूर्या आणि टीव्ही म्हणजे विषय कट
या दोघांनी उर्वरित धावांचा पाठलाग करताना कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी भारताला अगदी सहज विजय मिळवून देऊन सुपर फोरमध्ये स्थान मिळवले. ✅
तिलकच्या स्थिर ३१ धावांनी स्कोअरबोर्ड हलता ठेवला तर आपल्या बर्थ डे बॉय स्कायने birthday boy SKY अप्रतिम नाबाद ४७ धावा करून आपल्याला विजय मिळवून दिला. त्याने १६ व्या ओव्हरमध्ये एक षट्कार ठोकून विजयाची खणखणीत नोंद केली!🤙
**********
थोडक्यात धावसंख्या: पाकिस्तान १२७/९ (साहिबजादा फरहान ४०, कुलदीप यादवर ३/१८) चा भारताकडून सात विकेट्सनी पराभव १३१/३ (सूर्यकुमार यादव ४७*, सईम आयूब ३/३५).