News

बूम! इंग्लंडविरूद्ध बुमराहची सर्वोत्तम कामगिरी

By Mumbai Indians

IPL संपली, आता आणखी एका टेस्टची वेळ- कसोटी!
भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज होत असताना इंग्लिश फलंदाजांची झोप उडवणारा आपला एक खास खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमराह. त्याने फक्त २२.१६ च्या सरासरीने इंग्लंडविरूद्ध ६० विकेट्स घेतल्या आहेत.

चला टेप रिवाइंड करूया आणि बुमराच्या इंग्लंडविरूद्ध सर्वोत्तम पाच कामगिरीची उजळणी करूया. हे परफॉर्मन्स फक्त चांगले नव्हते तर अविस्मरणीय होते. 💙👇

1️⃣  विजगमध्ये ६/४५– फलंदाज शॉक्ड, बूम रॉक्ड 💥

विजग २०२४ मध्ये बुमराहने अक्षरशः धुमाकूळ घातला. ऑली पोपला टाकलेला घोटा फोडणारा यॉर्कर आठवतो का? आरारारा 🤯
बेन स्टोक्सनेही हात वर केले आणि विचारले: अरे हे कसं काय खेळायचं आता?

*****

2️⃣  नॉटिंगहममध्ये ५/६४– पहिल्या फळीचा चुराडा, बूम स्टाइलमध्ये ✅

आग अन् धूर संगटच म्हणतात याला. बुमराहने या २०२१ च्या सामन्यात हेच केले.

सिबली ✅

क्राऊली ✅

रूट ✅
या सामन्यात त्याने नऊ विकेट्स घेतल्या आणि दोन्ही इनिंग्समध्ये त्याला कोणीही थांबवू शकले नाही. 

*****

3️⃣  नॉटिंगहममध्ये ५/८५– पहिली इंग्लिश कसोटी, पहिल्या इंग्लिश ५ विकेट्स 🔥

२०१८. बुमराहची इंग्लंडमधली पहिली कसोटी. त्याने वादळ आणलं या सामन्यात.
त्याने या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. त्यात काही अप्रतिम विकेट्स होत्या. त्यामुळे भारताला २०३ धावांनी सणसणीत विजय मिळवता आला.

यातली बेस्ट गोष्ट कोणती माहीत आहे का? प्रत्येक विकेटनंतर केलेला जल्लोष. त्याचा उत्साह शिगेला पोहोचला होता 💯

*****

4️⃣  नॉटिंगहममध्ये ४/ ४६– २०२१ मध्ये ब्लॉकबस्टर ओपनिंग 🇮🇳🔥

२०२१ च्या दौऱ्याची सुरूवात आणि बूम तर शांत घ्यायला तयारच नव्हता. Start पहिल्या इनिंगमध्ये त्याने ४/४६ विकेट्स घेतल्या. ही नुसतीच धुराळ्याची कामगिरी नव्हती तर एक ताल आणि लय होती त्यात.

पण हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी थी दोस्त. 🎞️

*****

5️⃣  लॉर्ड्सवर ३/३३– जितका मोठा सामना, बूमची कामगिरी तेवढीच मोठी 💣

या सामन्याचे वर्णन करायचे झाल्यास याच वाक्यात करता येईलः “६० ओव्हर्समध्ये त्यांना नरकयातना झाल्या पाहिजेत.”
हा भारताचा प्लॅन होता आणि बूमने तो अंमलात आणला.

त्याने धोकादायक ठरणाऱ्या जो रूटला घरी पाठवले आणि त्या जगप्रसिद्ध विजयाचा पाया रचला 🎯

 

*****

यॉर्कर्स, सीमर्स, जल्लोष – आपण हे पाहिलंय.
आता आपण २०२५ इंग्लिश टूरवर जाताना बूम रिलोड करून हीच दृश्यं दाखवायला तयार आहे 💥