बघा बरं कोण आलंय ते!
ब्लू अँड गोल्डमधले चार स्टार्स आले आहेत. 💪
त्यांच्या मनात ऊर्जा आहे आणि निर्भयपणा आहे. 🔥
ते जगाच्या कानाकोपऱ्यातून वानखेडेवर पोहोचले आहेत. 🌎
पलटनचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 💙
क्विंटन डे कॉक, रायन रिकल्टन, कॉर्बिन बॉश आणि शेरफाने रूदरफोर्ड हे चौघे मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये आयपीएल २०२६ साठी एक नवीन ऊर्जा आणि विजयाची भूक घेऊन येत आहेत. त्यांचे मिशन एकच आहे. ते म्हणजे पलटनला सहावा चषक मिळवून देणे.
क्विनी हा सर्वाधिक स्फोटक विकेट कीपर फलंदाज असून तो #OneFamily मध्ये परतला आहे. त्याच्यासाठी हे खऱ्या अर्थाने होमकमिंग आहे. तो पहिल्या फळीत फटकेबाजी करतो, पॉवर प्लेदरम्यान स्फोटक आणि विश्वासू सुरूवात करून देतो. अत्यंत मौल्यवान विकेटकीपर जो अत्यंत उत्तम क्षमता आणि तग धरण्याची ताकद घेऊन येतो. येथील सेटअप आणि मुंबई इंडियन्सच्या संस्कृतीची ओळख त्याला आहे आणि तो स्टायलिश डावखुरा फलंदाज म्हणून समोर आला आहे जो पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करू शकतो.
Rickelton 𝘼𝙖𝙖𝘼𝙖𝘼𝘼𝙖𝙖𝙖𝘼𝙖𝙖la Re! ⚡🫶 pic.twitter.com/4zP256iMz5
— Mumbai Indians (@mipaltan) March 22, 2026
रायन रिकल्टन, हा आणखी एक डावखुरा अप्रतिम फलंदाज आहे. तो वरच्या फळीत इनिंग स्थिर करू शकतो. तो स्पर्धेच्या मोठ्या टप्प्यात अत्यंत संयमी, शांत आणि स्थिर असतो. तो अत्यंत हुशारीने खेळ खेळतो. तो तणावाखाली टिकू शकतो आणि सहजपणे जागा शोधून मैदानाबाहेर षट्कार ठोकू शकतो. स्टंप्सच्या मागे तो खूप सतर्क असतो. आपला एमआयमधला स्टार दक्षिण आफ्रिकेसाठी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये उत्तम खेळून आला आहे. आता ब्लू अँड गोल्डसाठी योगदान देण्यास उत्सुक आहे.
Time to turn the volume 𝐀𝐋𝐋 𝐓𝐇𝐄 𝐖𝐀𝐘 𝐔𝐏! 🗣️🔊 pic.twitter.com/I1XIJcTdts
— Mumbai Indians (@mipaltan) March 22, 2026
आपला अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉश सामन्यांमध्ये मोठमोठ्या गोष्टी लीलया पार पाडतो. तो अत्यंत शांतपणे कोणतीही गडबड गोंधळ न करता आपले काम करतो. एमआयच्या संघात तो एक संयम घेऊन आला आहे. त्याची घातक गोलंदाजी आणि मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता सामना क्षणात पालटवू शकते.
Wassup 𝐒𝐡𝐞𝐫𝐟𝐚𝐧𝐞, welcome to Hood! 💪 pic.twitter.com/DOLAJnKw9G
— Mumbai Indians (@mipaltan) March 22, 2026
शेरफाने रूदरफोर्ड हा कॅरेबियन खेळाडू शेवटच्या टप्प्यात मोठमोठे षट्कार ठोकण्यासाठी आणि फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो कोणत्याही वेळी येऊन सामन्याचे रूप बदलू शकतो. त्याचवेळी त्याच्याकडे मधल्या फळीत भागीदारी मोडीत काढण्याचीही क्षमता आहे. प्रत्येक स्टेडियमला आपल्या घरचे मैदान समजून खेळणाऱ्या या प्रभावी खेळाडूचा खेळ देखणा आहे.
हे सर्व वेगवेगळ्या ठिकाणांहून आले आहेत. परंतु ते एकच बॅच परिधान करतात. तो म्हणजे मुंबई इंडियन्स!