
चार ट्रॉफी, १७० विकेट्सनी मैदान गाजवणाऱ्या आपल्या स्लिंगाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
क्रिकेटमधल्या महान खेळाडूंचा विषय निघतो तेव्हा मनात भीतीने (आणि पलटनच्या मनात प्रेमाने) एक महत्त्वाचे नाव येतेते म्हणजे आपला लसिथ मलिंगा. आपला स्लिंगर, घोट्याचा वेध घेणारा राजा, ज्या माणसाने यॉर्कर्सला एक कला बनवले त्या खऱ्या मुंबई इंडियन्सच्या महान खेळाडूचा आज वाढदिवस.
एमआयच्या इतिहासात मलिंगा हा फक्त एक बॉलर नाही तर तो गेमचेंजर आहे. त्याने एका युगाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने १७० विकेट्स घेतल्या असून मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू तो ठरला आहे. आपल्या परीकथेत त्याचे नाव कोरलेले आहे.
अनेक सीझन्समध्ये त्याचे घोटा फोडणारे यॉर्कर्स भीतीदायक ठरले. त्याने स्टंप्सचाही श्वास कोंडला आणि चाहत्यांनी मानला रे तुला असा जल्लोष केला.
मलिंगा २००९ ते २०१९ या काळात फक्त संघाचाच भाग नव्हता. तो काळजाचा ठोका होता. २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या काळात खेळाडू म्हणून त्याच्या चार जादुई मोहिमा एमआयला चार आयपीएल चषक जिंकून देण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या आणि तो आपल्या #OneFamily मधला सर्वांत लाडक्या खेळाडूंपैकी एक ठरला. ✨
आणि २०१९ हे वर्ष कोण विसरू शकेल? आपला अंतिम सामना अत्यंत धोक्यात असताना मलिंगानेच विजयी नेतृत्व केले होते. त्याने ती अविस्मरणीय शेवटची ओव्हर टाकली आणि एमआयसाठी ट्रॉफी नावावर केली. स्पर्धेच्या इतिहासातील यापेक्षा सुंदर गुडबाय दुसरा कुठला नसेल… 🥹
'MI'NE 🏆💙#OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians #IPL2019Final #MIvCSK @hardikpandya7 pic.twitter.com/QJtarUtSiG
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2019
आपल्या हिटमॅनने या जलदगती गोलंदाजाने केलेल्या कामगिरीचे तोंड भरून कौतुक केले.
.@ImRo45: I had the belief in Malinga. We trust him. I trust him. He did the job for us. That's what a Champion does.
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2019
#OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians #IPL2019Final #MIvCSK
पण पिक्चर अभी बाकी थी दोस्त. 😉 फलंदाजांना यॉर्करने बाद करण्यापासून ते भविष्यातील तारे घडवण्यापर्यंत मलिंगाची एमआयचा गोलंदाजी प्रशिक्षक ही भूमिका तितकीच अमूल्य आहे. त्याच्याकडचा प्रचंड अनुभव, शांत स्वभाव आणि तरूण तसेच महान गोलंदाजांचा उत्साह वाढवण्याची त्याची क्षमता सातत्याने आपल्याला सामने जिंकून देते. तो प्रत्येक टीमच्या स्वप्नातला आणि फक्त एमआयकडे असलेला प्रशिक्षक आहे.
पलटनसाठी मलिंगा फक्त एक महान खेळाडू नाही तर तो एक कुटुंब आहे. 💙 त्याचा उत्साह, त्याच्या मनातील आग, त्याची स्माइल आणि त्याची हेअरस्टाइल मुंबई इंडियन्सला स्पेशल बनवते. स्लिंगाला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरपूर मोदक मिळोत (सध्या गणपती बाप्पा आहेत ना म्हणून) आणि प्रचंड मोद (आनंद, सुख, शांती) मिळोत. कारण तो जीनियस होता, जीनियस आहे आणि जीनियस राहणार.