News

INDvENG: रांचीमध्ये विजय! सीरिज ताब्यात! भारताला ३-१ वर नेताना रोहितची चमकदार कामगिरी

By Mumbai Indians

प्लेटोचे विधान - ‘आपण निष्ठेने लढलो तर आपण दुप्पट तयार असतो’ – हे भारताच्या दृष्टीने खरे ठरले. सोमवारी रांचीच्या चकवणाऱ्या विकेटवर भारताने पाच विकेट्सनी विजय मिळवला आणि किस्सा पालटला. 

इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये जो रूटच्या शतकासोबत वेग पकडला असे दिसत असतानाच शोएर बशीरने पाच विकेट्स घेतल्या. पण यजमान संघाने प्रथमच खेळणाऱ्या ध्रुव जुरेलचा देखणा खेळ (९० आणि ) तसेच रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव या स्पिनर्सने केलेली कमाल यांच्यामुळे आणि धावांच्या पाठलागादरम्यान रोहित शर्माच्या अर्धशतकामुळे घरच्या खेळपट्टीवर हा सामना जिंकला.

रांचीमध्ये झालेल्या कसोटी सामन्याची काही प्रमुख वैशिष्टे खालीलप्रमाणे.

रूट्सने इंग्लंडला वेग पकडून दिला

इंग्लंडने टॉस जिंकून जो रूटच्या २७४ चेंडूंमधील नाबाद १२२ धावांच्या मदतीने ३५३ ची धावसंख्या उभी केली. पाहुण्या संघाने दणदणीत फलंदाजी सुरू केलेली असली तरीही भारतीय संघाकडून रवींद्र जडेजा ४/६७ आणि आकाश दीप यांनी ३/८३ अशा विकेट्स घेऊन भारताचे आव्हान कायम ठेवले.

जैस्वाल, जुरेल यांनी भारताची गाडी रूळावर ठेवली

यशस्वी जैस्वालने भारत विरूद्ध इंग्लंट कसोटी मालिकेतील आठ इनिंग्समध्ये ६५५ धावा पूर्ण केल्या. या सामन्यात त्याने ७३ धावा फटकावल्या. त्याच्या या खेळामुळे ध्रुव जोरेलला कसोटी सामन्यात लढणे शक्य झाले.

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या या विकेटकीपर फलंदाजाने संयम, लढाऊ बाणा आणि मेहनत या बळावर ९० धावा केल्या. त्यामुळे भारताची पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या ३०७ वर गेली. शोएब बशीर (५/११९) आणि टॉम हार्टली (३/६८) यांच्या अप्रतिम गोलंदाजीचा सामना करून त्यांनी या धावा पूर्ण केल्या.

अश्विनच्या ३५ व्या कसोटी पाच विकेट्स आणि १९२ चे लक्ष्य

इंग्लंडने दुसऱ्या इनिंगमध्ये ४६ धावांची आघाडी घेतली. पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. रवीचंद्रन अश्विन (५/५१) आणि कुलदीप यादव (४/५५) या अनुभवी स्पिनर जोडीने पाहुण्या संघाच्या फलंदाजीला ५३.५ ओव्हरमध्येच खिंडार पाडले.

या मालिकेत विक्रमवीर बनण्यासाठी आतुर असलेल्या अश्विनने भारतीय खेळाडूने केलेल्या सर्वाधिक कसोटी पाच विकेट्स (३५)च्या अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी करून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला. पण महत्त्वाचे म्हणजे अश्विनने ही कामगिरी फक्त ९९ सामन्यांमध्ये केलीय!

हिटमॅनने आपली खास कामगिरी केली

रोहित शर्माने ८१ चेंडूंमध्ये ५५ अशी संयमी खेळी करून १९२ धावांच्या पाठलागाचा मूड तयार केला. त्यादरम्यान त्याने पाच चौकार आणि एक षटकार ठोकला. या इनिंगमध्ये हिटमॅनने तीन विक्रमांची बरोबरी केली- इंग्लंडविरूद्ध १००० कसोटी धावा, ४००० कसोटी धावा आणि ९००० फर्स्ट क्लास धावा आणि त्यानंतर त्याने फिनिशिंग टच देण्यासाठी शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांच्याकडे बॅटन दिली.

गिलने १२४ चेंडूंध्ये ५२ धावा केल्या तर पहिल्या इनिंगमध्ये भारतीय फलंदाजीचा हिरो ठरलेल्या जुरेलने विजेत्या धावा फटकावून तो ३९ धावांवर नाबाद राहिला. त्याच्या या फलंदाजीमुळे भारताला ०-१ अशी आपली सातवी मालिका जिंकणे शक्य झाले. त्याचबरोबर ३३ सामन्यांपैकी ३० सामने भारताने जिंकले आहेत आणि २०० पेक्षा कमी धावांचा पाठलाग घरच्या खेळपट्टीवर केला आहे.

थोडक्यात धावसंख्या: भारत ३०७ (ध्रुव जुरेल ९०, यशस्वी जैस्वाल ७३; शोएब बशीर ५-११९) आणि ५ वर १९२ (रोहित शर्मा ५५, शुभमन गिल ५२*, ध्रुव जुरेल ३९*; शोएब बशीर ३-७९) कडून इंग्लंडचा पाच विकेट्सनी पराभव ३५३ धावा (जो रूट १२२*, ऑली रॉबिन्सन ५८; रवींद्र जडेजा ४-६७) आणि १४५ (झॅक क्राऊली ६०; रवीचंद्रन अश्विन ५/५१, कुलदीप यादव ४/२२).