
INDvSL दुसरा ओडीआयः राहुलच्या खेळामुळे भारताने मालिका जिंकली
या सामन्यात कोलकात्याइतक्या तूफान धावा तर केल्या गेल्या नाहीत. परंतु नाट्यमयता मात्र खच्चून भरलेली होती. भारतीय फलंदाजांसमोर एडन गार्डन्सवरून श्रीलंकन गोलंदाजांना परत पाठवण्याचे मोठे आव्हान होते. परंतु केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी हे काम पार पाडले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेची सुरूवात चांगली झाली. त्यांनी यजमान संघासमोर २१६ धावांचे लक्ष्य ठेवले. सुरूवातीला पटापट विकेट्स पडल्यामुळे स्टेडियमवर चिंतेचे वातावरण होते. परंतु राहुलने शेवटच्या टप्प्यात सामना ताब्यात घेतला आणि भारताला मालिकेत २-० ची आघाडी मिळवून दिली.
स्पिनर्सची जादू चालली!
प्रथमच खेळणाऱ्या नुवानिंदू फर्नांडो आणि कुसल मेंडीस यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावा केल्या आणि प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूवर त्यांनी धावा काढल्या. कर्णधार रोहित शर्माने मग जलदगती गोलंदाजांना थोडी सुट्टी दिली आणि स्पिनर्सना खेळवले. मग लगेचच विकेट्स पडल्या.
कुलदीप यादव आणि अक्झर पटेल यांनी आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट्स घेतल्या आणि अर्धशतक करणाऱ्या नुवानिंदूला शुभमन गिलच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणापुढे आपली विकेट द्यावी लागली. कुलदीपने आपल्या पुढच्या दोन ओव्हर्समध्ये दोन विकेट्स घेतल्या आणि भारतीयांसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या दासून शनाकालाही बाद केले.
खालच्या फळीने श्रीलंकेला तारले
वानिंदू हसरंगाने नंतरच्या टप्प्यात येऊन जोरदार हल्ला करायला सुरूवात केली. त्याने १७ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या. दुनिथ वेलालागे आणि कसून रजिता यांनी नंतर ३८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे ते २०० धावांचा टप्पा पार करू शकले. त्यानंतर सिराज गोलंदाजीसाठी परतला. त्याने एकाच ओव्हरमध्ये शेवटच्या दोन विकेट्स घेतल्या. श्रीलंकेचा संघ १० पेक्षा जास्त ओव्हर्स शिल्लक असताना २१५ धावांवर सर्वबाद झाला.
एक्शनने भरगच्च पॉवर प्ले
मधल्या सुट्टीनंतर भारताची सुरूवात अत्यंत नाट्यमज झाली. हिटमॅनने एडन गार्डन्सवर मागच्या वेळी हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते तेव्हा ओडीआयच्या इतिहासातली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली होती. त्याला काही छान शॉर्ट चेंडू भेट आले आणि शुभमन गिलनेही अगदी शास्त्रशुद्ध ड्राइव्ह्ज मारले. परंतु सलामी फलंदाज पटापट बाद झाले आणि विराट कोहलीदेखील नंतर लवकरच बाद झाला. त्यामुळे भारतीय धावफलक ६२-३ वर आला.
४० मिनिटांत नऊ चौकार, एक षटकार, तीन विकेट्स.
हार्दिक आणि राहुलकडून आपल्या तटबंदीला वाढदिवसाची भेट
राहुल द्रविड काल ५० वर्षांचा झाला. आपल्या भारतीय मुख्य प्रशिक्षकाला हार्दिक पंड्या (५३ चेंडूंमध्ये ३६ धावा) आणि राहुल (१०३ चेंडूंमध्ये ६४ धावा) यांच्याकडून थोडी उशिरा भेटवस्तू मिळाली. या दोघांनी अप्रतिम बाऊन्स आणि स्पिनचे प्रदर्शन करणाऱ्या श्रीलंकन गोलंदाजांविरूद्ध मजबूत टिकाव धरला. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढला, हार मानली नाही, प्रत्येक धाव मोजून मापून काढली आणि भारताला लक्ष्याच्या जवळ आणून ठेवले (हे धोरण अगदी द्रविडच्या स्टाइलचे होते.)
त्यांनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावा केल्या.
राहुलकडून स्टाइलमध्ये समारोप!
पंड्या बाद झाल्यानंतर अक्झप पटेलने अगदी थोडावेळच खेळून आपली चुणूक दाखवली. त्याने मिडविकेटवर एक जोरदार षटकार खेचला. भारताला अजूनही ३५ धावा कमी पडत होत्या. परंतु राहुलने मात्र डाव सावरून धरला आणि भारताला धावांचा पाठलाग पूर्ण करून दिला.
भारताने हा सामना चार विकेट्सनी जिंकला आणि आपल्याविरूद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील ९५ वा पराभव नोंदवला. त्यामुळे एखाद्या प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध सर्वाधिक पराभवाच्या विक्रमाची त्यांनी बरोबरी केली.
थोडक्यात धावसंख्या
श्रीलंका ३९.४ ओव्हर्समध्ये २१५ धावा सर्वबाद (नुवानिंदू फर्नांडो ५०, मोहम्मद सिराज ३/३०) भारत- ४३.२ ओव्हर्समध्ये २१९/६ धावा (केएल राहुल ६४*, हार्दिक पंड्या ३६). श्रीलंकेचा भारताकडून पराभव.