News

आयपीएल काऊंटडाऊनः २ दिवस बाकी- एका धावेने जिंकलेल्या दोन आयपीएल फायनल्स

By Mumbai Indians

भारताच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) नावाच्या एका महान उत्सवाला सुरू होण्यास फक्त दोनच दिवस शिल्लक आहे. दोन दिवस. म्हणजे ४८ तास. २८८० मिनिटे आणि १७२८०० सेकंद. आता थोडाच अवधी शिल्लक आहे, पलटन. तुमची फॅ (एमआय) ली, तुमचे वानखेडे आणि तो काळ पुन्हा अनुभवण्यासाठी तुम्ही आतुर आहात का?

२०२३ च्या आपल्या पहिल्या सामन्याची सुरूवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध करण्यापूर्वी आपण आता अशा दोन आयपीएल फायनल्सची माहिती घेणार आहोत जिथे आपण फक्त १ धाव काढून विजयी ठरलो आहोत.

२०१७: अरे हा सामना अत्यंत भारी होता. आधी फलंदाजीला उतरलेल्या एमआयने कृणाल पंड्याच्या धडाकेबाज खेळीवर स्वार होऊन (३८ चेंडूंमध्ये ४७ धावा) ७९/७ वरून १२९/८ पर्यंत मजल गाठली. तिथून पुढे आपला लढवय्या बाणा हळूहळू जागा होऊ लागला. त्यानंतर गोलंदाजी करताना पुण्याकडे स्टीव्ह स्मिथ आणि एम.एस. धोनी असल्यामुळे एमआयवर थोडासा ताण होता आणि त्यांनी धावांचा पाठलाग जोरदार केला.

गणि: चार ओव्हर्समध्ये ३३ धावांची गरज. एमआयला काय करता येणार होते? हा खेळ त्यांच्या बाजूने कसा येणार होता? जसप्रीत बुमरा, लसिथ मलिंगा आणि मिशेल जॉन्सन यांनी हार मानायची नाही असे ठरवले होते. २३ वर्षीय बुमराने धोनीला बाद केले आणि १८ ओव्हर्समध्ये मलिंगाने फक्त ७ धावा दिल्या. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये मिचकडे ११ धावा होत्या.

एकामागून एक विकेट्स आणि पहिल्या तीन चेंडूंवर चौकार. पुन्हा सामना फिरला, नाही का? शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज होती आणि १९.५ वर डॅन ख्रिश्चन बाद झाला. सुपर ओव्हरसाठी तीन धावा. मुंबईला खूप जोरदार लढा द्यावा लागणार होता. मग काय झाले? रन आऊट झाला. मिशेल जॉन्सन आणि एमआय पलटनने एकच जल्लोष केला. स्टेडियम दणाणून सोडले. कारण पुण्याला जिंकण्यासाठी फक्त एकच धाव कमी पडली.

२०१९

रोहित शर्मा विरूद्ध एमएस धोनीः हे दोन्ही संघ तीन वेळा विजयी ठरलेले होते आणि एक नवीन विक्रम नावावर नोंदला जाणार होता. एक खेळाडू चार आयपीएल ट्रॉफी जिंकणार. एकतर्फी वर्चस्व नव्हते. सामना कोणाच्याही बाजूने फिरू शकला असता कारण कायरन पोलार्डने सीएसकेचा हल्ला २५ चेंडूंमध्ये ४१ धावा करून मोडून काढला होता. डेथ ओव्हर्समध्ये चेन्नई ठाण मांडून बसली होती. त्यांनी शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये फक्त १३ धावा दिल्या आणि त्यांच्यासाठी फक्त १५० धावांच्या पाठलागाचे लक्ष्य ठेवले.

फाफ दू प्लेसिसने १३ चेंडूंमध्ये २६ धावा करून १५० धावांच्या पाठलागाची सुरूवात तर जोरदार केली. पण तो बाद झाल्यानंतर हळूहळू सामना घसरत चालला. सुरेश रैना, अंबाटी रायाडू आणि एमएस धोनी हे तिघेही फक्त एक अंकी धावसंख्या करून बाद झाले आणि शेन वॉट्सन हा मेन इन यलोसाठी एकांडे शिलेदार होता. त्याने सहा चेंडूंमध्ये नऊ धावांवर सामना आणून ठेवला.

तुमचे नाव मोठे असले की जबाबदारीही मोठी असते. आपल्या लसिथ मलिंगाचेही तसेच होते. त्याने आयपीएल करियरच्या त्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करायला घेतली. पहिल्या तीन चेंडूंमध्ये १. १. २ अशा धावा केल्या गेल्या आणि हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर आणि घराघरातल्या टीव्हींवर सन्नाटा पसरला. चौथ्या चेंडूवर शेन वॉट्सन बाद झाला आणि संपूर्ण स्टेडियम निळ्या रंगात झळकले. शेवटच्या चेंडूवर दोन धावांचा बचाव करताना स्लिंगा मलिंगाने अत्यंत सुंदर हळूवार यॉर्कर टाकला आणि शार्दुल ठाकूर बाद झाला. एलबीडब्ल्यू. आपण आपला चौथा चषक जिंकलो होतो.