News

"मी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यॉर्कर्स शिकलो"- आकाश मधवाल आपला ५/५ खेळाडू

By Mumbai Indians

अत्यंत मितभाषी असलेला परंतु चेंडूसोबत भरपूर गप्पागोष्टी करणारा आकाश मधवाल हा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी असलेला हिरो ठरला आहे. आज रात्री त्याने ५/५ अशी कामगिरी केली. आयपीएलच्या इतिहासातला कॅप नसलेल्या खेळाडूचा हा विक्रम त्याच्या मेहनतीवर रोहित भैयाने दाखवलेल्या विश्वासाचे प्रदर्शन तर होताच पण संधी हातात घेतली की गुणित होते हेही त्यातून दिसून  आले.

आपले सहकारी खेळाडू, प्रशिक्षक आणि कुटुंबासोबत या क्षणाचा आनंद घेत असताना या सामनापटूने थोडा वेळ काढला आणि सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कुतूहल असलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

चेन्नईतल्या एमए चिदंबरम स्टेडियमवरील पिच जलदगती गोलंदाजांसाठी फारसे चांगले नव्हते. परंतु आकाशने त्यावर आपला हक्क गाजवला. दुसऱ्या इनिंगमध्ये खेळपट्टीमध्ये मोठे बदल झाले का?

“चेपॉकची खेळपट्टी चांगली होती. तुम्ही पाहिले की चेंडू उसळत नव्हता तर घसरत होता. मी एक स्विंग/स्लिंग गोलंदाज आहे. त्यामुळे मी विकेट्स घेण्यावर लक्ष केंद्रित करून उत्तम लांबीचे चेंडू टाकले,” आकाश म्हणाला.

प्रत्येक गोलंदाजाची क्रिकेटमध्ये त्याच्या शैलीबाबत एक गोष्ट असते. आकाश मधवालबाबत सांगायचे झाल्यास उत्तराखंडमधील त्याच्या गावी त्याने खेळलेले टेनिस बॉल क्रिकेट त्याला कारण ठरले. आपल्या सध्याच्या गोलंदाजीमध्ये तो टेनिस बॉलमधल्या कोणत्या युक्त्या वापरतो हे विचारले असता तो म्हणाला की, “टेनिस बॉलच्या माध्यमातून मी यॉर्कर्स कसे टाकायचे हे शिकलो आणि आज मी माझ्या गोलंदाजीत त्याचा वापर करतो. हे चेंडू टाकण्याची एकमेव पद्धत आहे. चेंडूची लांबी थोडी जास्त किंवा कमी ठेवली तर चौकार किंवा षटकार ठरलेलाच असतो. त्यामुळे मला टेनिस क्रिकेटमध्ये मजबूत यॉर्कर टाकावे लागत असत आणि आज मी हेच क्रिकेटच्या चेंडूसोबतही करतो.”

अत्यंत आनंदात असलेल्या आकाशला आतापर्यंतच्या करियरबाबत प्रश्न विचारले असता त्याने आपल्या महत्त्वाकांक्षांबाबत सांगितले. “मी उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनला बीसीसीआयकडून २०१८ साली अधिस्वीकृती मिळाली तेव्हापासून त्यांच्यासोबत आहे. २०१९ साली मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत नेटमध्ये गोलंदाजी करत होतो. त्यानंतर मी मुंबई इंडियन्समध्ये आलो आणि पुन्हा एकदा नेटमध्ये गोलंदाजी करू लागलो. आजच्या दिवसाला मला टीममध्ये खेळायची संधी मिळाली आहे.”

जसप्रीत बुमरा आणि जोफ्रा आर्चर यांनी या सीझनमध्ये एमआयच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणे अपेक्षित होते. परंतु ते दुखापतग्रस्त झाल्यामुळे बाजूला राहिले आहेत. मधवालने आपल्या आजच्यासारख्या अप्रतिम कामगिरीद्वारे वेळेत बदल मिळाल्याबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे. शिवाय त्या विभागात त्याच्यावर काही अतिरिक्त जबाबदारी आहे का असेही विचारण्यात आले. परंतु या २९ वर्षाच्या खेळाडूने सांगितले की, “माझ्यावर टीमने दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करायचा मी प्रयत्न करतो आहे. मी बुमराची जागा घ्यायला आलेलो नाही तर मला शक्य तितके सर्वोत्तम करायचा प्रयत्न करतो आहे.”

स्काऊटिंग टीम नेटमधील गोलंदाजाला नेमते तेव्हा त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली जाते. सराव सामन्यांमध्ये खेळाडूंची संपूर्ण टीम आणि निवड समिती तुम्हाला नेटमधील गोलंदाज म्हणून पाहत असते तेव्हा तुम्हाला तुमची कौशल्ये सिद्ध करून दाखवावी लागतात.

“आलेल्या कोणत्याही संधींचा आपण लाभ घेऊन त्याचा पुरेपूर वापर करणे गरजेचे असते.”

संधींबाबत बोलताना मधवालने २०२२ मध्ये एमआयमध्ये प्रथम खेळतानाची आठवण सांगितली. दुखापतग्रस्त खेळाडू आपला दादा सूर्याच्या बदली खेळाडू म्हणून त्याला साइन करण्यात आले होते. परंतु त्याला खेळवले गेले नाही. तरीही त्याने टीमसोबत सराव कायम ठेवला आणि २०२३ मध्येही तो संघात राहिला. “मला संघातल्या माझ्या जबाबदारीची स्पष्टता देण्यात आली होती. मी आधी ज्या प्रक्रियेचे पालन करत होतो ती करत राहावी लागेल आणि मला पुढच्या सीझनमध्ये संधी मिळेल अशी खात्री देण्यात आली होती. हे अगदी स्पष्ट होते.”

मधवालला २०२२ मध्ये उत्तराखंडच्या टी२० टीमचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्याच्याच शब्दात सांगायचे तर मला कामाच्या भाराचे संतुलन साधावे लागत होते, पण ही संधी घेताना मला खूप आनंद झाला. एक गोलंदाज म्हणून सामन्याचे मूल्यमापन करण्याची एक विशिष्ट पद्धत होती. परंतु कर्णधार झाल्यानंतर माझी खेळपट्टी तसेच सामन्याच्या स्थितीचा अभ्यास करण्याची पद्धत व्यापक झाली.

बाकी तर त्याचे यॉर्कर्स येतच राहणार आहेत. तो हे कदाचित मान्य करणार नाही परंतु जसप्रीत बुमराची कमी भरून काढणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. परंतु त्याचा विचारपूर्वक खेळ, कधी कोणता चेंडू टाकायचा याचा अनुभव या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांसाठी मंत्रमुग्ध करणाऱ्या ठरल्या आहेत.