News

DC vs MI मॅच प्रीव्ह्यू: दिल्लीला त्यांच्या घरीच हरवण्यासाठी उतरणार हार्दिक अँड कंपनी

By Mumbai Indians

आपल्या टीमसाठी आयपीएल २०२४ चा आतापर्यंतचा प्रवास थोडा कठीण राहिला आहे. परंतु टीमला परतायचे कसे हे नक्कीच माहीत आहे. याच उत्साह आणि अभिमानाने हार्दिक अँड कंपनी दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या घरच्या खेळपट्टीवर हरवण्यासाठी तयार आहे. 

शनिवार, २७ एप्रिल रोजी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आयपीएल २०२४ चा ४३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होईल.

मागच्या सामन्यात आपल्या टीमला राजस्थान रॉयल्सकडून त्यांच्या होम ग्राऊंडवर ९ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. परतु सामन्यात तिलक वर्माने ६५ आणि नेहल वढेराने २४ चेंडूंमध्ये ४९ धावांची दणकेबाज कामगिरी केली होती. एमआयला आतापर्यंत ८ सामन्यांमध्ये ३ विजय मिळाले आहेत. त्यामुळे टीम आता चौथ्या विजयासाठी आतुर असेल.

आपल्या प्रतिस्पर्धी टीमचा विचार केल्यास डीसीने आपल्या मागच्या सामन्यात गुजरात टायटन्सविरूद्ध ४ धावांनी विजय मिळवला होता. दिल्लीने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. त्यात ४ सामन्यांमध्ये विजय तर ५ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सला हिटमॅन रोहित शर्माकडून एका मोठ्या स्कोअरची अपा असेल. त्याने आतापर्यंत या सीझनमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहितने ८ सामन्यांमध्ये १६२.९० च्या स्ट्राइक आणि ४३.२९ च्या सरासरीने ३०३ धावा केल्या आहेत. त्यात एक शतकी खेळीदेखील आहे.

रोहितशिवाय डावखुरा स्फोटक फलंदाज तिलक वर्मादेखील फॉर्ममध्ये आहे. त्याने ८ सामन्यांमध्ये १५१.६६ च्या स्ट्राइक रेटने २७३ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने दोन अर्धशतकेदेखील केली आहेत.

गोलंदाजीत नेहमीप्रमाणेच आमच्या जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराकडून टीमला खूप अपेक्षा असतील. बुमराने आतापर्यंत ८ सामन्यांमध्ये ६.३७ च्या इकॉनॉमी आणि १५.६९ च्या सरासरीने १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने या सीझनमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी २१/५ अशी केली आहे.

बुमरासोबतच त्याचा जलदगती गोलंदाज जोडीदार गेराल्ड कोत्झीनेही या सीझनमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने ८ सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत.

त्यामुळे एमआयला हा सामना जिंकायचा असेल तर आपल्या गोलंदाजांना दिल्लीच्या फलंदाजांवर आधीपासूनच लगाम खेचावा लागेल.

हेड-टू-हेड आकडेवारी

एमआय आणि डीसीचा एकमेकांशी ३४ वेळा सामना झाला आहे. त्यात मुंबई इंडियन्सने १९ वेळा विजय मिळवला आहे तर दिल्ली कॅपिटल्सने १५ वेळा विजय प्राप्त केला आहे. या दोन्ही टीम्समध्ये खेळवण्यात आलेल्या शेवटच्या पाच सामन्यांमध्ये आपल्या टीमने तीन वेळा विजय नोंदवलाय. आयपीएल २०२४ मध्ये या दोघांमध्ये एक सामना खेळवला गेला आहे. त्यात मुंबईने २९ धावांनी विजय प्राप्त केला.

काय: आयपीएल २०२४ चा ४३ वा सामना, दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स

कधी: शनिवार, २७ एप्रिल २०२४. दुपारी ३.३० वाजता.

कुठे: अरूण जेटली स्टेडियम, दिल्ली 

काय अपेक्षा आहे: दिल्लीच्या फलंदाजीसाठी अनुकूल पिचवर आपल्या फलंदाजांची हिटिंग पॉवर बघायला तयार व्हा. टीम एक नवीन उत्साह आणि आनंदाने या सीझनचा आपला चौथा विजय नोंदवण्यासाठी मैदानात उतरेल.

आपण काय करायचे आहे: मागच्या सामन्यातला निकाल विसरून एका नवीन आशेने आपल्या टीमला चिअर अप करा. पलटन तुमचा उत्साहज मैदानावर ब्लू अँड गोल्ड जर्सीच्या शक्तीचे प्रतीक आहे.