News

आयपीएल सामना १४ वा | PBKSvMI ग्राफिकल पूर्वावलोकन: प्लेऑफ्सवर शिक्का… आता टॉप २ मध्ये प्रवेशाची उत्सुकता!

By Mumbai Indians

लीग टप्प्यातला शेवटचा भाग आता सुरू झालाय पलटन. हा आपला नेहमीचा सामना नाहीये! 💥

आपली पोरं पंजाब किंग्सचा सामन अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत करायला तयार आहेत आणि या सामन्यात बरेच काही पणाला लागले आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीमकडे प्लेऑफ्सची तिकिटे आहेत. परंतु आता गुणतक्त्यावर टॉप २ मध्ये eyes locked on that top-2 finish एंट्री करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

अडखळती सुरूवात ते वेगवान मुसंडीपर्यंत आपल्या टीमने या सीझनमध्ये बरेच काही पार पाडले आहे. अर्थात, आपले काम अद्याप संपलेले नाही. खेळ सुरूच आहे आणि आपल्याला अद्याप बरेच काही करायचे आहे.

प्लेऑफ्स सुरू होण्यापूर्वी हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे आपल्या अतिशय बुद्धिमान अशा तज्ञांनी आपल्यासाठी आणलेले ग्राफिकल पूर्वावलोकन पाहूया!

PBKS vs MI – आयपीएलमध्ये एकास एक रेकॉर्ड

आपण १५-१८ वर जाऊ शकतो का? हो. आपण हे करायला तयार आहोत का? कोई शक! 👊

**********

सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलमध्ये पॉवर प्लेची सरासरी धावसंख्या

मागच्या सीझन्सच्या तुलनेत विद्यमान सीझनमध्ये विशेषतः दुसऱ्या इनिंगमध्ये पॉवर प्लेची धावसंख्या जास्त आहे.

आपल्यासाठी महत्त्वाचे म्हणजे टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणे हे असेल! 🤝

**********

बोल्टी आणि अर्शदीप- आयपीएल २०२५ मध्ये लांबीचा खेळ समजून घेऊया

सध्या तरी हे दोन्ही डावखुरे जलदगती गोलंदाज प्रचंड फॉर्ममध्ये आहेत.

त्यांना या सीझनमध्ये प्रचंड यश मिळालेले आहे आणि आगामी सामन्यात आपल्या विकेट्समध्ये भर घालायला ते उत्सुक असतील.

**********

बूमसलग नऊ सीझन्समध्ये १५+ विकेट्स

हा आपला खेळाडू एक हिरा आहे. त्याची सातत्यपूर्णता चकित करणारी आहे. हा विक्रम आपल्या राष्ट्रीय खजिन्याला अभिमानास्पद वाटतो.

कोणत्याही सीझनमध्ये बुमराहची इकॉनॉमी ८ पर्यंत गेलेली नाही. ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. कारण हल्ली फलंदाज गोलंदाजांची हयगय करत नाहीत. दुखापतीतून बरे झाल्यानंतर त्याने २०२५ च्या सीझनमध्ये नऊ सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या आहेत.

पीबीकेएसबाबत सांगायचे झाल्यास आपल्या स्ट्राइक गोलंदाजाने ६.३ च्या सरासरीने १६ सामन्यांमध्ये २३ विकेट्स घेतल्या आहेत. 👏

**********

आमनेसामने सामन्यांमध्ये बाद करण्याच्या पद्धती

आपल्या आऊटफिल्ड फील्डर्ससाठी मज्जा आहे… 🤓

**********

ठीकेय मग. आता सगळे सज्ज आहेत आणि संघही तयार आहे! 🔥

टॉप टूमध्ये जागा मिळवण्यासाठी आवश्यक तो विजय मिळेल आणि पहिल्या क्रमांकावर येऊ अशी आशा करूया!