आयपीएल सामना ४ | MIvRCB: आपले घर, आपला बालेकिल्ला, आपले वानखेडे! आम्ही परत आलोय

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्स १२ एप्रिल २०२६ रोजी वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना मोठी मेजवानी मिळेल अशी आशा आहे. मागील काही वर्षांत या दोन्ही संघांमधील सामना चाहत्यांसाठी अनेक अविस्मरणीय आठवणींचा खजिना घेऊन आला आहे. तणाव आणि सर्वोत्तम कामगिरी एकत्र येते आणि त्यातून जादू घडते. प्रत्येक चौकार, षट्काराने इतिहास घडवला, मेन इन ब्लू संघाने घेतलेली प्रत्येक विकेट पलटनचा मूड बदलून गेली. 😀 येत्या रविवारी हे दोन्ही संघ एकत्र येतील तेव्हा एक नवीन इतिहास घडवला जाईल. 💙

आता टीम सज्ज झाली आहे. एमआयचा कमबॅक त्यांना बसलेल्या धक्क्यापेक्षा जास्त मजबूत असेल. आता इतिहासात जाऊन या स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक अविस्मरणीय आठवणींचा खजिना उलगडण्याची वेळ झाली आहे.

पोलार्डच्या ताकदीने बॅड्रीची हॅटट्रिक झाकोळून टाकली (२०१७)

१४ एप्रिल २०२७ रोजी बंगळुरूने एक अप्रतिम शो पाहिला. पीओटीएम कायरन पोलार्डने तीन चौकार आणि पाच षट्कारांच्या मदतीने अप्रतिम ७० (४७) धावा केल्या. त्याने एमआयला ४ विकेट्सनी विजय मिळवण्यास मदत केली आणि १८.५ ओव्हर्समध्ये १४५/६ धावा केल्या. सॅम्युएल बॅड्रीच्या हॅटट्रिकच्या मदतीने आरसीबीने वेग पकडला होता. परंतु केपीने एमआय विजयी होईल याची काळजी घेतली.

*****

रोहिटमॅनच्या खास कामगिरीमुळे एमआयचा विजय (२०१८)

मुंबईचा राजा आणि पीओटीएम रोहित शर्मा याने १७ एप्रिल २०१८ रोजी वानखेडेवर मुंबई इंडियन्सला हा सामना ४६ धावांनी जिंकून दिला. आपण आधी फलंदाजी करत होतो. तेव्हा आपण २० ओव्हर्समध्ये २१३/६ धावा केल्या. आपल्या या सुपरहिरोने फक्त ५२ चेंडूंमध्ये ९४ धावा केल्या. त्यात त्याने १० चौकार आणि पाच षट्कार ठोकले. आरसीबी पाठलाग करताना गडबडली आणि फक्त १६७/८ पर्यंत पोहोचू शकली.

*****

बंगळुरूमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंतच्या रोमांचक सामन्यात एमआयचा विजय (२०१९)

पीओटीएम जसप्रीत बुमराहने ३/२० सह मास्टरक्लास दिला. त्यामुळे आपल्याला २८ मार्च २०१९ रोजीचा आरसीबीविरूद्धचा सामना जिंकणे शक्य झाले. यॉर्कर्स, स्पिन्स आणि अचूकता. पलटनने हे सगळे मनापासून पाहिले. आधी सुरूवातीला फलंदाजी करताना एमआयने २० ओव्हर्समध्ये १८७/७ धावा केल्या. रोहित शर्माने ४८(३३) आणि एचपीने नाबाद ३२(१४) धावा केल्या.

*****

वानखेडेवर झालेली मलिंगाची जादू (२०१९)

१५ एप्रिल २०१९ रोजी पीओटीएम आणि यॉर्कर किंग लसिथ मलिंगा याने चार विकेट्स घेतल्या (४/३१) आणि आरसीबीचा संघ २० ओव्हर्समध्ये १७१/७ वर गुंडाळला गेला. एमआयने ही अटीतटीची स्पर्धा घरच्या खेळपट्टीवर सहा चेंडू शिल्लक असताना जिंकली. त्याच सामन्यात क्विंटन डे कॉकने ४० धावा करून इनिंग सुरक्षित ठेवली आणि आपल्या कुंग फू पांड्याने नाबाद ३७ (१६) धावा फटकावल्या.

*****

स्कायची सुपला फटकेबाजी (२०२३)

९ मे २०२३ रोजी एमआयने वानखेडेवर वर्चस्व गाजवले. आपण आरसीबीच्या १९९/६ धावांचा पाठलाग करताना २१ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. या वेळी सूर्यादादाने अगदी सहजपणे सहा षट्कार ठोकले. त्याने २३७.१४ च्या सरासरीने ८३ (३५) धावा केल्या. त्यामुळे त्याला पीओटीएम पुरस्कार देण्यात आला.

*****

Number crunching

खेळलेले सामने

३४

एमआयने जिंकले

१९

आरसीबीने जिंकले

१४

बरोबरीत

 

एमआय आकडेवारी आरसीबी
रोहित शर्मा (६२९ धावा) सर्वाधिक धावा विराट कोहली (९२२ धावा)
जसप्रीत बुमराह (२९ विकेट्स) सर्वाधिक विकेट्स युजवेंद्र चहल (२२ विकेट्स)

 

तर आता आपल्या विश्वासावर उभारलेला वारसा परिस्थिती बदलेल. तेव्हा पलटन अभिमानाने वानखेडेवर गर्जना करेल! 👊💙