News

IRE vs IND: भारताकडून पहिल्या टी२०आय सामन्यात आयर्लंडचा २ धावांनी पराभव

By Mumbai Indians

भारत आणि आयर्लंडदरम्यान तीन टी२०आय मालिकेतील पहिला सामना डबलिनच्या दि व्हिलेज स्टेडियमवर खेळवला गेला. भारताने डकवर्थ अँड लुइस नियमा (डीएलएस) अंतर्गत दोन धावांनी विजय नोंदवून मालिकेत १-० ची आघाडी नोंदवली. या सामन्याद्वारे रिंकू सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले.

भारतीय कर्णधार जसप्रीत बुमरा यांनी टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे आयर्लंडने आधी फलंदाजी करून सात विकेट्सवर १३९ धावा केल्या आणि भारतासमोर १४० धावांचे लक्ष्य ठेवले.

आयर्लंडच्या खेळाकडे एक लक्ष

आधी फलंदाजी करायला उतरलेल्या आयर्लंडच्या टीमची सुरूवात चांगली ठरली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराने दमदार पुनरागमन करत आयर्लंडच्या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यांनी अँड्र्यू बालबर्नी आणि लॉर्कन टकरला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवून भारताला एक नवीन सुरूवात करून दिली.

यानंतर कर्णधार पॉल स्टर्लिंग आणि हॅरी टेक्टर यांनी सामना सावरायचा प्रयत्न केला. परंतु भारताचे नवीन खेळाडू प्रसिद्ध कृष्णा यांनी पाचव्या ओव्हरमध्ये हॅरीची (९) विकेट घेतली आणि अशा प्रकारे यजमान टीमने आपली तिसरी विकेट घालवली. त्यानंतर कर्णधार स्टर्लिंग (११) आणि जॉर्ज डॉकरेल (१) यांच्या सलग दोन विकेट्स पडल्या. इथे रवी बिष्णोईने स्टर्लिंगला बाद केले तर कृष्णाने डॉकरेलची विकेट आपल्या नावावर केली.

आयर्लंडच्या खेळाला मार्क अडायर आणि कर्टिस कॅम्फरने पुढे नेले. आयर्लंडची सहावी विकेट अडायर (१६) च्या रूपात पडली. रवी बिष्णोईच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू झाला. बॅरी मॅकार्थी आणि कॅम्फर यांच्यादरम्यान सातव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. अर्शदीप सिंगने कॅम्फरला आपली विकेट बनवले. आयर्लंडने २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स देऊन १३९ धावा केल्या. मॅकार्थीने ३३ चेंडूंवर ५१ धावांची नाबाद खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमरा, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या तर आयर्लंडसाठी बॅरी मॅकार्थीने अर्धशतकी कामगिरी केली.

भारतीय संघाच्या खेळावर एक नजर

भारतीय संघ १४० धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात उतरला होता. सलामी फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी खूप सांभाळून खेळायला सुरूवात केली होती. परंतु भारताला यशस्वी जैस्वालच्या रूपाने पहिला फटका बसला.

अप्रतिम फलंदाजी करत असलेल्या यशस्वीला यंग ने स्टर्लिंगच्या हातात कॅच देऊन बाद केले. या भारतीय फलंदाजाने तीन चौकार आणि एक षटकार मारून २३ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या. यानंतर तिलक वर्मा शून्यावर बाद होऊन पॅव्हिलियनला परतला.

याच दरम्यान पावसामुळे सामना थोडा वेळ थांबवला गेला. परंतु पाऊस न थांबल्यामुळे हा सामना डकवर्थ अँड लुईस नियमांतर्गत दोन विकेट्सनी भारतीय टीमच्या हातात पडला. भारताने दोन विकेट्स देऊन ४७ धावा केल्या. सामन्याच्या शेवटी ऋतुराज १९ धावा आणि संजू सॅम्सन १ धाव काढून नाबाद राहिले.

आता भारतीय संघाचा आयर्लंडविरूद्ध पुढचा टी२०आय सामना २० ऑगस्टला असेल.

थोडक्यात धावसंख्या

भारत (६.५ ओव्हर्स - ४७/२ ): यशस्वी जैस्वाल (२४), रवी बिष्णोई (२/२३)

आयर्लंड (२० ओव्हर्स - १३९/७): बॅरी मॅकार्थी (५१*), क्रेग यंग (२/२)