आणि आता सुरू झालंयः मिशन #6

By Mumbai Indians

आयपीएल 2026 पूर्वी मुंबई इंडियन्सने आपल्या सराव शिबिराला सुरुवात केली. प्रशिक्षक वर्गात लसिथ मलिंगा आणि पारस म्हाम्ब्रे यांच्या आगमनाने टीम जोशात दिसत होती. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी सराव पुन्हा सुरू केला तर शार्दुल ठाकूर आणि मलिंगाच्या भेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. 🏆💙

जसजसा दिवस सरत गेला तसतसे एमआयचे खेळाडू सरावासाठी तयार झाले. किटबॅग्स घेतल्या गेल्या, स्पाइक बांधले गेले आणि हिरव्यागार मैदानावर सरावाला सुरुवात झाली. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी खेळाडूंना एकत्र बोलावून मोलाचा मंत्र दिला, "मैदानावर संयमाने खेळा आणि एकमेकांच्या पाठीशी उभे राहा."

त्यानंतर नेट्समध्ये सराव करण्यात आला. खेळाडूंनी आयपीएल 2026 साठी आपली लय आणि रणनीतीवर काम करण्यास सुरुवात केली.

शिबिरादरम्यान लसिथ मलिंगा आणि शार्दुल ठाकूर ही एका गुरू आणि शिष्याची पुनर्भेट झाली. 2010 साली तरुण शार्दुल ठाकूर मुंबई इंडियन्ससाठी नेट गोलंदाज म्हणून आपली जागा निर्माण करत होता, तर मलिंगा संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व करत होता. त्यानंतर 2019 मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील संस्मरणीय अंतिम सामना खेळला गेला तेव्हा दोघे वेगवेगळ्या संघांमध्ये होते. त्या सामन्यात मलिंगाने ठाकूरला एलबीडब्ल्यू बाद केले आणि मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

आता 2026 मध्ये क्रिकेटचा सर्वात मोठा उत्सव सुरू होण्यापूर्वी गुरु आणि शिष्य एकाच सराव शिबिरात एकत्र आले आहेत. क्रिकेटची जादू ही अशी असते. ती तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. पलटण, आता ब्लू अँड गोल्ड परिधान केलेल्या आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्याची वेळ आली आहे. आता जगाला “दे धक्का”! 💙