"आपण परिस्थितीतून कसे सावरतो हे पाहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे": जयवर्धने

"आपण परिस्थितीतून कसे सावरतो हे पाहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे": जयवर्धने

By Mumbai Indians

पाच सामन्यांत चार पराभव. सलग चार पराभव. यापूर्वीही हे झाले आहे. आपण यातून बाहेर पडायला हवे. पण आज पंजाब किंग्जविरुद्धच्या या कठीण पराभवानंतर परिस्थिती चिंताजनक आहे याची आम्हाला कल्पना आहे.

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते आणि त्यांनी सुरुवातीच्या विकेट्स गमावूनही टीमने कसा प्रयत्न केला आणि येथून सावरण्याची गरज कशी आहे याबद्दल सांगितले.

"आम्हाला अजून मेहनत करण्याची गरज आहे. अद्याप नीट लय सापडलेली नाही. आम्ही उत्तम गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला भेदू शकलो नाही. ही अशी गोष्ट आहे ज्यावर आम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि आपण त्यात कशी सुधारणा करू शकतो ते पाहावे लागेल, "त्याने खेळाचा सारांश मांडला.

एक महत्त्वाची नवीन गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराह फार विकेट्स घेत नाहीये. त्याची आपल्याला सवय नाही. पण महेलाला त्याची चिंता नव्हती. "बूम चांगली गोलंदाजी करत आहे. आम्ही पॉवरप्लेमध्ये दबाव आणत नाही. त्यांना माहीत आहे की त्यांना बूमविरुद्ध जोखीम घेण्याची गरज नाही. आम्ही काही गोष्टींचा प्रयत्न केला आहे. तोही त्यावर अंमलबजावण करत आहे. प्रतिस्पर्धी संघ चांगली फलंदाजी करत आहेत. त्याने विकेट का घेतल्या नाहीत हे महत्त्वाचे नाही तर आपल्याला स्वतःवर काम करण्याची आणि आपण काय करू शकतो ते पाहण्याची आवश्यकता आहे, "असे ते म्हणाले.

"आपण कसे चांगले होऊ शकतो हे पाहणे आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे. मला माहीत आहे की आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. आम्ही अद्याप स्पर्धेतून बाहेर पडलेलो नाही. परंतु इतर संघ चांगले, तंत्रशुद्ध खेळत आहेत. त्यांच्याकडे अशा प्रकारची सुरुवात असते तेव्हा त्यांचा आत्मविश्वासही जास्त असतो. आपण फक्त ज्या टप्प्यांवर नियंत्रण ठेवू शकतो त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ही जबाबदारी केवळ एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण टीमची आहे. आम्हाला लय सापडण्यासाठी आणि तो आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी, तसंच विजय मिळवण्यासाठी अधिक चांगला खेळ करणे गरजेचे आहे. "

क्विंटन डी कॉकचे शानदार शतकासह क्रमवारीत अव्वल स्थानावर पुनरागमन आणि नमन धीरने चौथ्या क्रमांकावर अर्धशतकासह छाप पाडणे या मुंबई इंडियन्ससाठी सकारात्मकक गोष्टी होत्या. महेलाने त्याबद्दल आनंद व्यक्त केला.

"नमन हा वरच्या फळीतील फलंदाज आहे आणि तो आमच्यासाठी उत्तम कामगिरी करत आहे. त्याने संधी मिळाली तेव्हा त्या संधीचे सोने केले. त्याने संपूर्ण सीझनमध्ये आमच्यासाठी चांगली फलंदाजी केली. आमच्या मते अधिक चांगल्या कामगिरीसाठी काही गोष्टी बदलाव्या लागतील.

आता दंवाचा घटक. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या प्रतिस्पर्धी फलंदाजांसह २०० पेक्षा कमी धावसंख्येचा बचाव करणे कठीण होते. पण आमचे मुख्य प्रशिक्षक फक्त कारणे देणारे नव्हते. गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

"दंव पडले तेव्हा खेळपट्टीत बदल झाला. त्यांनी गोलंदाजी केली तेव्हा विकेट कमजोर होती आणि पकड घेत होती. त्याही परिस्थितीत आम्ही शानदार फलंदाजी केली असे मला वाटते. मला आमच्या फलंदाजांना श्रेय द्यायचे आहे. कारण त्यांनी कठीण परिस्थितीत मजबूत आक्रमणाविरुद्ध जोरदार पुनरागमन केले. ज्याप्रकारे आम्ही युझीवर (युजवेंद्र चहल) दबाव आणला ते पाहता आमच्या रणनीतीनुसार आम्ही शानदार खेळ केला," असे ते म्हणाले.

"आमच्यासाठी पॉवरप्लेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे ही आमच्यासाठी महत्त्वाचा गोष्ट होती. सहा ओव्हर्समध्ये आम्हाला दोन विकेट्स मिळाल्या परंतु पण आम्ही धावाही दिल्या. पहिल्या ओव्हरमध्ये २० धावा झाल्याने आमच्यावर ताण आला. पहिल्या दहा ओव्हर्समध्ये दव पडण्यापूर्वी आम्ही दबाव ठेवला असता, आणखी विकेट्स घेतल्या असत्या, तर खेळ बदलला असता. पण आम्ही ते करू शकलो नाही. त्यांच्याकडे वेग होता. याच फरकामुळे आमचा पराभव झाला."

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना सोमवारी (२० एप्रिल) गुजरात टायटन्सशी होणार आहे. २०१४, २०१५ आणि २०२५ मध्ये आम्ही अशाच स्थितीत होतो आणि त्यानंतर आम्ही वादळी कामगिरी केली आहे. आता २०२६ मध्ये हाच कित्ता पुन्हा गिरवण्याची वेळ आली आहे.