News

जोफ्रा आर्चर - एमआय केपटाऊनमध्ये वाइल्ड कार्डने प्रवेश

By Mumbai Indians

बातमी खरी आहे. बिचारे फलंदाज! त्यांना आता कुठेच आसरा मिळणार नाही. कागिसो रबाडासारख्या आगीला हाताळणे आणि राशीद खानचा रहस्यमय स्पिन सांभाळणे त्यांच्यासाठी आधीच कठीण झाले होते. आता दुष्काळात तेरावा महिना म्हणून जोफ्रा आर्चरच्या जोरदार बॉम्ब्सचा त्यांना सामना करावा लागेल.

हो, जेफ्रा आर्चर आगामी एसए२० सामन्यासाठी एमआय केपटाऊनचा वाइल्ड कार्डने निवडलेला खेळाडू ठरला आहे. कोपराला झालेल्या दुखापतीतून आणि कमरेजवळ झालेल्या स्ट्रेस फ्रॅक्चरमधून बरे होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून साधारण दोन वर्षांचा ब्रेक घेतलेला आर्चर आता स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 

तो आता इंग्लड लायन्स संघासोबत परतला आहे. त्याने आपले नेहमीचेच काम पुन्हा सुरू केले आहे- ते म्हणजे फलंदाजांना सळो की पळो करून सोडणे. त्याचा वेग अचूक आहे, त्याची अचूकताही आहे आणि त्याची विकेट्सची भूकही कायम आहे.

१० जानेवारीपासून ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत खेळणारा आर्चर एसए२० मध्ये आमच्या स्टार्सच्या पंगतीत असणार आहे. त्याच्यासोबत त्याचे इंग्लंडचे तीन खेळाडू असतील- लियाम लिव्हिंग्स्टन, ऑली स्टोन आणि सॅम कॅरेन. आता वाट बघवत नाहीये. दिव्यांखाळी झळाळणारे धमाकेदार न्यूलँड्सचे पिच आणि जोफ्रा आर्चर एकामागून एक स्टंप्स उडवतोय. या वेळी खूप मज्जा येणार आहे.  

चला तर पलटन, होऊया तय्यार!