News

सामन्याचे पूर्वावलोकन, MI vs KKR: पुढच्या विजयासाठी आतुरता

By Mumbai Indians

आमची आनंदी आणि उत्साही टीम ९ मे रोजी डी वाय पाटील स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्ससोबत झुंजायला तयार आहे. 

मागील दोन सामन्यांमध्ये मिळालेल्या दोन विजयांमुळे संपूर्ण सीझनमध्ये आम्ही ज्या वेगाच्या प्रतीक्षेत होतो तो वेग मिळालाय आणि केकेआरविरूद्ध याची पुनरावृत्ती होईल अशी आम्हाला आशा वाटते!

आकडेवारी बऱ्यापैकी आमच्या बाजूने आहे. आम्ही आमच्या विरोधकांविरूद्ध ३० सामन्यांपैकी २२ सामने जिंकले आहेत आणि मागील पाच सामन्यांमध्ये ३-२ असा विजय मिळवला आहे.

मात्र या सीझनमध्ये सुरूवातीला केकेआरने आमच्यापेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे.

या खेळाडूंवर ठेवा लक्ष

पॉवर हिटर आंद्रे रसेल हा केकेआरसाठी चांगला खेळाडू आहे. त्याने मागच्या सामन्यात १९ चेंडूंवर ४५ धावा फटकावल्या आहेत.

स्पिनरल सुनील नरिने हाही एक चांगला गोलंदाज आहे. त्याने मागच्या तीन सामन्यांमध्ये ५ किंवा कमी धावा दिल्या आहेत.

मधल्या फळीमध्ये रिंकू सिंग आणि नितीश राणा यांनीही महत्त्वाच्या धावा काढल्या आहेत.

आमच्यासाठी कॅप्टन हिटमॅन आणि ओपनर ईशान किशन यांनी एक चांगली सुरूवात करून दिली आहे आणि पॉवर प्ले जोरदार केला आहे.

डॅन सॅम्स मागच्या काही सामन्यांमध्ये चांगला खेळू लागलाय. त्याने जीटीविरूद्धच्या शेवटच्या ओव्हरमध्ये नऊ धावा वाचवण्यासाठी सुंदर गोलंदाजी केली.

स्कायने तीन अर्धशतके काढली असून इनिंगच्या शेवटच्या टप्प्यात काही अत्यंत सुंदर शॉट्स खेळले आहेत.

आगामी टप्पे

रो टी२०मध्ये ९०० चौकारांपासून फक्त सात चौकार दूर आहे. त्याला आमच्यासाठी ५००० धावा पूर्ण करण्यासाठी ८८ धावांची गरज आहे.

डॅन सॅम्स आपल्या बॉलसोबत सुंदर खेळत असला तरी आपल्या बॅटसोबतही एक महत्त्वाचा टप्पा पार करू शकतो. तो ५० टी२० षटकार पूर्ण करण्यापासून फक्त दोन हिट्स दूर आहे.

चला मुलांनो, चला पलटन तयार व्हा. आम्ही सलग तिसऱ्या विजयासाठी आतुर आहोत!