News

एमआय ज्युनियरः एंजेल मिकी मिनी स्कूल यू-१४ मुलांचा ४२९ धावांनी विजय

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्स आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या लीग फेरीत सोमवारी १६ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात मध्यमगती गोलंदाज पार्थ शिंदेच्या अप्रतिम आठ विकेट्सच्या आधारे पोदार इंटरनॅशनल स्कूलने आर्यन वर्ल्ड स्कूल, वारजेवर सहा विकेट्सनी विजय मिळवला.  

सर्वप्रथम फलंदाजीला उतरलेल्या आर्यन्स वर्ल्ड स्कूलचा संघ फक्त ५८ धावांवर गुंडाळला गेला. पार्थने ८-२३ अशी कामगिरी करून प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनलने खूप कमी असलेले लक्ष्य पटापट पूर्ण केले आणि ५.३ ओव्हर्समध्ये विजय मिळवला.

आणखी एका एकतर्फी झालेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात अँजेल मिकी मिनी स्कूल, हडपसरने विद्याशिल्प पब्लिक स्कूल, कोंढवा बुद्रुकवर तब्बल ४२९ धावांनी विजय नोंदवला. नरेंद्र चौधऱीने वर्चस्व गाजवले (७० चेंडूंमध्ये नाबाद १८० धावा) आणि ओम तांबेच्या सुंदर खेळामुळे (६-१७ अँजेल मिकी मिनी स्कूलच्या विजयात मोठा हातभार लागला.

आधी फलंदाजीला उतरलेल्या अँजेल मिकी मिनी स्कूलने ४७४ धावांचा डोंगर रचला. नरेंद्र आणि आदित्य गायकवाड यांनी (४६ चेंडू ९४ धावा) आणि श्लोक हरपाले (५९ वर ७० धावा) आपल्या टीमला एक जबरदस्त धावसंख्या उभारण्यासाठी मदत केली.

त्यानंतर ओम तांबेने सहा विकेट्स घेऊन अँजेल मिकी मिनी स्कूलसाठी विजय मिळवून दिला आणि त्यात त्याने हॅटट्रिकसुद्धा साधली. धावांचा पाठलाग करायला उतरलेला विद्याशिल्प पब्लिक स्कूलचा संघ फक्त ४५ धावांवर बाद झाला.

१५ वर्षांखालील मुलींच्या सामन्यात आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजेने अँजेल मिकी मिनी स्कूल, हडपसरवर ४२ धावांनी विजय प्राप्त केला. आर्यन्स वर्ल्ड स्कूलसाठी संस्कृती खांडेकर (५-७) स्टार ठरली.

आधी फलंदाजीला उतरलेल्या आर्यन्स वर्ल्ड स्कूलचा संघ १०४ धावांमध्ये रोखला गेला. परंतु तणावाखाली असतानाही संस्कृतीच्या सुंदर फलंदाजीमुळे त्यांना अँजेल मिकी मिनी स्कूलला ६२ धावांवर रोखून टीमवर विजय मिळवणे शक्य झाले.

थोडक्यात धावसंख्या:

१४ वर्षांखालील मुले

  1. आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी, कात्रज २४.१ ओव्हर्समध्ये ७५ धावांवर सर्वबाद (अमेय ऐनापुरे २३; धीर सेठ ४-१७) चा विबग्योर हायस्कूल बालेवाडीकडून ९.४ ओव्हर्समध्ये ७६/१ धावांवर पराभव (अर्जुन माहुली ३६*).

सामनापटूः धीर सेठ

  1. आर्यन्स वर्ल्ड स्कूल वारजे ३०.४ ओव्हर्समध्ये १२६ सर्वबाद (आर्यन देवडकर ३०; अंश टिल्लू ५-२२) चा कल्याणी स्कूल, हडपसर मांजरीकडून १५ ओव्हर्समध्ये १२९/४ धावांवर पराभव (अथर्व सातव २८).

सामनापटूः अंश टिल्लू.

  1. अँजेल मिकी मिनी स्कूल, हडपसर ३५ ओव्हर्समध्ये ४७४/६ (नरेंद्र चौधरी १८०*, आदित्य गायकवाड ९४, श्लोक हरपाले ७०; वेदांश भारद्वाज ३-३५) (५ पेनल्टी धावांसह) कडून विद्याशिल्प पब्लिक स्कूल, कोंढवा बुद्रुकचा ११.५ ओव्हर्समध्ये सर्वबाद ४५ धावांवर पराभव (राजेश्वर सुतार २०*; ओम तांबे ६-१७).

सामनापटूः नरेंद्र चौधरी

  1. अँग्लो ऊर्दू बॉइज हायस्कूल, कॅम्प २३ ओव्हर्समध्ये १३७ धावांवर सर्वबाद (मोहित कदम ३-३३) कडून एमव्हीएम पंडितराव आगाशे स्कूल, प्रभात रोडचा २७.३ ओव्हर्समध्ये ११७ धावांवर पराभव (मोहित कदम २३, असीम खान ४-१५)

सामनापटूः असीम खान.

१६ वर्षांखालील मुले

  1. आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे ११.५ ओव्हर्समध्ये ५८ धावांवर सर्व बाद (क्षितिज गावडे १९; पार्थ शिंदे ८-२३) चा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, वाकडकडून ५.३ ओव्हर्समध्ये ६४/४ धावांवर पराभव (सर्वज्ञ पाटील २२; सात्विक शुक्ला २-२४). सामनापटूः पार्थ शिंदे
  2. जयहिंद हायस्कूल, पिंपरी ४० ओव्हर्समध्ये २७९/५ (आकाश तवले ८१*, जय देशपांडे ७७) कडून आर्यन वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी, कात्रजचा २२.१ ओव्हर्समध्ये ८१ धावांवर पराभव (प्रज्वल पवार ५-२४) सामनापटू: प्रज्वल पवार

१५ वर्षांखालील मुली

  1. आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे १९.४ ओव्हर्समध्ये १०४ धावा (तेजस्विनी मोरे ३-१८, केतकी चव्हाण ३-२०) कडून अँजेल मिकी मिनी स्कूल, हडपसरचा १३.३ ओव्हर्समध्ये ६२ धावांवर सर्वबाद करून पराभव (संस्कृती खेडेकर ५-७). सामनापटूः संस्कृती खेडेकर.
  2. जयहिंद हायस्कूल, पिंपरी २० ओव्हर्समध्ये १२६/८ (सेजल पाल ३-२७) कडून प्रोडिजी पब्लिक स्कूल, वाघोलीचा १८.४ ओव्हर्समध्ये ८७ धावांवर सर्वबाद करून पराभव (अद्विका जाधव ३९; मुस्कान शेख २-१०, शर्वरी खिलारी २-१३)

सामनापटूः शर्वरी खिलारी