News

एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धाः अध्यान, कृष्णा, कुश आणि इतरांची त्यांच्या टीम्ससाठी अप्रतिम कामगिरी

By Mumbai Indians

अध्यान रौथान, कृष्णा अडलकिया, कुश शर्मा आणि इतरांनी सध्या सुरू असलेल्या एमआय ज्युनियर आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेच्या नागपूर टप्प्यात आपापल्या टीम्ससाठी सुंदर खेळ केला.

अध्यान रौथानच्या जोरदार खेळामुळे (९९ मध्ये १८८ धावा) सेंटर पॉइंट स्कूल (दाभा)ला नागपूरमध्ये झालेल्या एमआय ज्युनियर १६ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात सोमलवार हायस्कूलविरूद्ध (निकालस ब्रँच) २६९ धावांचा दणदणीत विजय मिळवणे शक्य झाले.

एका टप्प्यावर सेंटर पॉइंट स्कूल खूप अडचणीत होती. त्यांनी फक्त ४५ धावांमध्ये तीन विकेट्स घालवल्या होत्या. त्यानंतर अध्यानने तणावाखाली असतानाही स्फोटक खेळ केला आणि संघाला ४० ओव्हर्समध्ये ३४० धावांवर नेऊन पोहोचवले.

प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरलेल्या सोमलवार स्कूलचा खेळ बहरलाच नाही. हा संघ फक्त ७१ धावांमध्ये बाद झाला. राज कापसेने ५ धावांमध्ये ४ विकेट्स घेतल्या.

आणखी एका १६ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात डावखुरा स्पिनर कृष्णा अडलखिया (५-२) ने टिप टॉप कॉन्व्हेंट स्कूलला पूर्णपणे आडवे केले आणि भवन्स बी. पी. विद्यामंदिर, श्रीकृष्ण नगरला अत्यंत सहजपणे १० विकेट्सनी विजय मिळवून दिला. भवन्स बी. पी. विद्यामंदिरने एकही विकेट न घालवता फक्त ६.२ ओव्हर्समध्ये ४२ धावांचे नगण्य लक्ष्य पूर्ण केले.

दरम्यान नागपूरमध्ये उपांत्य फेरीला सुरूवात झाली आणि १४ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात सामने खेळले गेले.

१४ वर्षे वयाखालील उपांत्य सामन्यात कुश शर्माच्या अष्टपैलू खेळामुळे सेंटर पॉइंट स्कूल, वर्धमान नगरला पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, बेसाविरूद्ध ८ विकेट्सनी विजय मिळवता  आला. कुशच्या ५ विकेट्सच्या सुंदर गोलंदाजीमुळे पोद्दारचा संघ फक्त ९२ धावांवर आटोपला. कुशच्या नाबाद ३८ धावांच्या बळावर सेंटर पॉइंटने हे लक्ष्य फक्त १०.३ ओव्हर्समध्ये पूर्ण केले.

आणखी एका १४ वर्षे वयाखालील उपांत्य सामन्यात सिद्धेश रत्नपारखीने नारायण विद्यालय, कोराडीचा धुव्वा उडवला. त्याने तब्बल ६ विकेट्स घेतल्या (६-४ एका हॅटट्रिकसह) आणि त्यांना फक्त ८ धावांवर घरी पाठवले.

आधी फलंदाजीला उतरलेल्या सोमलवार हायस्कूल रामदासपेठने कृष्णा सारटकरच्या १०३ धावांच्या बळावर ४० ओव्हर्समध्ये ३४१ धावा केल्या. त्यानंतर सिद्धेशच्या बॉलची जादू चालली. दुसरीकडे कृष्णाने तोडफोड केली (४-३) आणि सोमलवार हायस्कूलवर ३३३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

आणखी एका १४ वर्षे वयाखालील मुलांच्या सामन्यात एस्पायर इंटरनॅशनल स्कूल, वर्धा रोडच्या मयूर शर्माने केलेल्या ४-१६ च्या देखण्या गोलंदाजीमुळे सरस्वती विद्यालय हायस्कूल, शंकर नगरला ७३ धावांनी पराभव पत्करावा लागला. काश्यप पातारकरच्या ६७ धावांमुळे एस्पायर इंटरनॅशनलच्या टीमला २२२/६ धावा नोंदवणे शक्य झाले. प्रत्युत्तरासाठी उतरलेल्या सरस्वती विद्यालयाचा संघ १४९ धावांमध्ये सर्वबाद झाला.

१६ वर्षे वयाखालील मुलांच्या सामन्यात विजयासाठी २२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भाविक ठेंगरेने नाबाद अर्धशतक फटकावून साऊथ पब्लिक स्कूल, ओंकार नगरला सेंटर पॉइंट स्कूल, वर्धमान नगरला पाच विकेटनी विजय मिळवायला मदत केली. राम अनंतवार (२-३३) आणि भाविक ठेंगरे (२-४२) हे साऊथ पब्लिक स्कूलसाठी सर्वोत्तम गोलंदाज ठरले.

आणखी एका १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात क्रिश सोनकुसरेच्या अष्टपैलू कामगिरीमुळे (६४ आणि ५-४८) श्री राजेंद्र हायस्कूल कोठी रोडला कर्वेज न्यू मॉडेल पब्लिक स्कूल, लक्ष्मीनगरविरूद्ध ४१ धावांनी विजय प्राप्त करता आला.

थोडक्यात धावसंख्या:

१४ वर्षांखालील मुले

सेंटर पॉइंट स्कूल, वर्धमान नगर ३२.४ ओव्हर्समध्ये ९२ सर्वबाद (प्रथम घाटे ३१; कुश शर्मा ५-२४) चा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बेसाकडून १०.३ ओव्हर्समध्ये ९३/२ धावांवर पराभव (राधे महादणे ४१, कुश शर्मा ३८*).

सामनावीर- कुश शर्मा

सोमलवार हायस्कूल, रामदासपेठ ४० ओव्हर्समध्ये ३४१/६ (कृष्णा सराटकर १०३; धृव अटोने ४-९४)कडून नारायण विद्यालय, कोराडीचा ४.१ ओव्हर्समध्ये ८ धावांमध्ये सर्वबाद करून पराभव (सिद्धेश रत्नपारखी ६-४, कृष्णा सराटकर ४-३)

सामनावीर- कृष्णा सराटकर

एस्पायर इंटरनॅशनल स्कूल, वर्धा रोड ४० ओव्हर्समध्ये २२२/६ (कश्यप पाटारकर ६७; ओंकार तातावार ३-३३) कडून सरस्वती विद्यालय हायस्कूल, शंकर नगरचा ३५.४ ओव्हर्समध्ये १४९ धावांवर सर्वबाद करून पराभव (यश चौडे ८५; मयूर शर्मा ४-१६).

सामनावीर- मयूर शर्मां

श्री राजेंद्र हायस्कूल कोठी रोड ४० ओव्हर्समध्ये २१७/५ (आर्यन नागपुरे ६५, क्रिश सोनकुसरे ६४; तन्मय पवार २-४९) कडून कर्वेज न्यू मॉडेल पब्लिक स्कूल लक्ष्मीनगरचा ३५.२ ओव्हर्समध्ये १७६ धावांवर सर्वबाद करून पराभव (साईश भिसे ९३; क्रिश सोनकुसरे ५-४८).

सामनावीर- क्रिश सोनकुसरे.

१६ वर्षे वयाखालील मुले

टिप टॉप कॉन्व्हेंट स्कूल, दीनदयाळ नगर १४.१ ओव्हर्समध्ये ४१ धावांवर सर्वबाद (कृष्णा अडलखिया ५-२) चा भवन्स बी. पी. विद्यामंदिर, श्रीकृष्ण नगरकडून ६.२ ओव्हर्समध्ये ४२/० वर पराभव.

सामनावीर- कृष्णा अडलखिया.

सेंटर पॉइंट स्कूल, दाभा ४० ओव्हर्समध्ये ३४०/७ (अध्यान रौतान १८८; नचिकेत देवतळे २-२६) कडून सोमलवार हायस्कूल, निकलस शाखेचा २८.४ ओव्हर्समध्ये ७१ धावांवर सर्वबाद करून पराभव (राज कापसे ४-५).

सामनावीर- अध्यान रौतान.

सेंटर पॉइंट स्कूल, वर्धमान नगर ४० ओव्हर्समध्ये २२८/९ (देवराज पाटील ९५; राम अनंतवार २-३३, भाविक टेंगरे २- ४२) चा साऊथ पब्लिक स्कूल, ओंकार नगरकडून ३७.५ ओव्हर्समध्ये २३२/५ धावांवर पराभव. (भाविक ठेंगरे ६७*).

सामनावीर- भाविक ठेंगरे.