एमआय स्टार ट्रॅकर [स्मॅट 2022]
Blurb: तडाखेबाज हिट्सपासून ते थोडक्यात चुकणे, नवनवीन उच्चांक गाठण्यापासून ते बॅड पॅचपर्यंत- भारतीय देशांतर्गत खेळातल्या आमच्या काही सुपरस्टार्सचा हा रिपोर्ट
उपांत्य फेरी | दिवस १०- ३ नोव्हेंबर २०२२
रमणदीप सिंग: आधीच संपलेल्या आणि हरणार असलेल्या पाठलागात रमणदीप सिंगने जोरदार प्रतिहल्ला चढवत १५ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार फटकावून हिमाचल प्रदेशच्या गोलंदाजांना घाम फोडला.
मयंक मार्कंडे: मोठ्या उपांत्य फेरीच्या दिवशी मयंक मार्कंडेच्या पहिल्या तीन चेंडूंवर एक चौकार आणि दोन षटकार ठोकण्यात आले. या ओव्हरमध्ये त्याने १९ धावा दिल्या. बस्स, त्यानंतर त्याने गोलंदाजी केलीच नाही.
अनमोलप्रीत सिंग: आज अनमोलप्रीत सिंगने नेहमीप्रमाणे अर्धशतक फटकावले नाही पण २५ चेंडूंमध्ये ३० धावा मात्र केल्या. त्याने चांगली भागीदारी केली आणि प्रचंड धावांच्या पाठलागासाठी एक पाया रचून दिला. पण नंतर डावखुऱ्या फलंदाजाच्या स्पिनने तो बाद झाला.
दिवस ५ - १८ ऑक्टोबर २०२२
ईशान किशन: राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून आल्यावर ईशान किशनने आपल्या प्रतिमेला साजेसा खेळ केला. त्याने आपल्या टीममध्ये उत्साह भरताना १८ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि एक षटकार ठोकत २४ धावा फटकावल्या.
अनमोलप्रीत सिंग: सलग तिसऱ्या सामन्यात अनमोलप्रीत सिंगऐवजी डीएनबीला संधी मिळाली आहे. पंजाबच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला फक्त ४० धावांमध्ये गुंडाळले.
तिलक वर्मा: सलग चार अर्धशतके पूर्ण केल्यावर तिकल वर्माला शेवटी अपयशाला सामोरे जावे लागले. त्याने १० चेंडूंमध्ये १३ धावा केल्या.
आर्यन जुयाल: त्याने सुरूवात तर चांगली केली. उत्तर प्रदेशच्या संघाने एकदोन विकेट्स लवकर घालवल्यानंतर वादळ थोडे शमले असे वाटत असतानाच त्याने धडाकेबाज खेळ करत १५ चेंडूंमध्ये १८ धावा पूर्ण केल्या.
अर्जुन तेंडुलकर: अत्यंत कमी धावा झालेल्या रोमांचक सामन्यात अर्जुन तेंडुलकरने अगदी सुरूवातीला चांगला खेळ केला. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये उत्तर प्रदेशच्या कर्णधाराला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर तो डेथ ओव्हर्समध्ये परत आला. अत्यंत कडेकोट कामगिरी करत त्याने आणखी एक विकेट घेतली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
रमणदीप सिंग: मिझोरमच्या फलंदाजांचा खेळ पत्त्यासारखा कोसळत असलेल्या सामन्यात शेवटच्या ओव्हर्समध्ये रमणदीप सिंग गोलंदाजी करायला आला आणि त्याने सलग चेंडूंवर आठव्या आणि नवव्या क्रमाकांच्या फलंदाजांना बाद केले.
हृतिक शोकीन: तीन ओव्हर्समध्ये १/२४ ची आकडेवारी खूप छान वाटत नसली तरी त्याने तिलक वर्माची विकेट घेतली. ही अशा व्यक्तीची विकेट होती ज्याने सलग चार अर्धशतके पूर्ण केली. त्यामुळे अनेकांच्या नजरा उंचावल्या.
राहुल बुद्धी: त्याचा फॉर्मच फक्त कमी जास्त होत नाहीये पण कधीकधी तर त्याच्या विजयाची संधीही पुढेमागे होत राहिली. फलंदाजीच्या फळीत खालीवर होत राहिलेल्या राहुल बुद्धीला शेवटी आपल्या नेहमीच्या क्रमाने खेळायला यायला मिळाले. त्याने शेवटच्या क्रमावर येऊन तीन चौकार आणि तीन षटकारांसह ३५ चेंडूंमध्ये ४७ धावा फटकावल्या.
मयंक मार्कंडे: ३.१-०-४-४. विश्वास बसत नाही ना? मिझोरमच्या मधल्या फळीविरूद्ध तो असाच सुंदर खेळलाय आणि या फळीला त्याने आपल्या भेदक खेळाने खिंडार पाडले.
संजय यादव: तामिळनाडूच्या बऱ्याचशा खेळाडूंना आपला पाय स्थिरावायला खूप मेहनत करावी लागली. संजय यादवचीही तीच परिस्थिती होती. त्याचा खेळ: २१(२२).
आकाश माधवाल: आकाश माधवालसाठी हा शून्य विकेट दिवस होता. त्याने आपल्या चार ओव्हर्समध्ये ३३ धावा देऊन एकही विकेट घेतली नाही. त्याने सुरूवातीला खूप धावा दिल्या पण इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या नाड्या आवळून फक्त तीन धावा दिल्या आणि रन-आऊटचे आव्हानही केले.
जयदेव उनादकट: सौराष्ट्रच्या कर्णधारासाठी हा एक अत्यंत सुंदर दिवस होता. त्याने चार ओव्हर्समध्ये अत्यंत अचूक २/२४ ची कामगिरी केली. या दोन्ही विकेट्स हिमाचल प्रदेशला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी जोरदार फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांच्या होत्या.
मुरूगन अश्विन: मागचा सामना खेळण्याची संधी हुकल्यानंतर पुन्हा खेळायला उतरलेल्या मुरूगन अश्विनने अगदी शून्य मिनिटात आपल्या चेंडूची कमाल दाखवली. त्याने अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर दोन विकेट्स घेतल्या आणि चार ओव्हर्समध्ये फक्त २९ धावा दिल्या. त्यामुळे झारखंडचा खेळ थोडक्यात आटोपला.
दिवस ४ - १६ ऑक्टोबर २०२२
अनमोलप्रीत सिंग: त्याचं अर्धशतक पुन्हा एकदा हुकलं कारण त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. अत्यंत कमी धावांचं लक्ष्य समोर असताना पंजाबच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अनमोलसाठी काही शिल्लक ठेवलंच नाही.
तिलक वर्मा: ५०, ५७, ६२, ६७. अर्धशतकांची हॅटट्रिक झाल्यावर आपल्याला खूप कौतुक वाटतं. पण तिलकने तर एकामागून एक चार अर्धशतकं फटकावली आहेत. त्याने १४५ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलंय. त्यात त्याने सात चौकार आणि दोन षटकार ठोकलेत. त्याने आपल्या एकट्याच्या खांद्यावर हैदराबादची धुरा उचलली आहे. बघा हे वादळ थांबवायला जमतं का ते!
राहुल बुद्धी: सहाव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकापर्यंत ते सलामीपर्यंत. राहुल बुद्धीचं तर फलंदाजीच्या क्रमात सतत प्रमोशनच होऊ लागलंय. पण दुर्दैवाने त्याच्या नावासमोरच्या धावांची संख्या तितकीशी मजबूत नाहीये. आज त्याने थोडा प्रयत्न केला खरा. फक्त १६ धावा करायला त्याने २५ चेंडू घेतले. मजा नाही आली फार.
बसिल थम्पी: टी२० मध्ये सहापेक्षा कमी असलेला सरासरी दर कायमच चांगला असतो आणि आपल्या या खेळाडूने आज तेच साध्य केलंय. त्याने मधल्या ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली आणि चांगला खेळलायः ४-०-२२-०.
संजय यादव: तो अजून फार चांगलं खेळत नाहीये. अलीकडेच झालेल्या टीएनपीएलमध्ये त्याचा फॉर्म उत्तम होता. पण स्मॅटमध्ये त्याची जादू काही चालली नाही. तो चार सामन्यांत दोन वेळा शून्यावर बाद झाला. नेमक्या दुसऱ्याच चेंडूवर तो एलबीडब्ल्यू झाला.
मयंक मार्कंडे: प्रतिस्पर्धी संघाला स्वस्तात बाद करणाऱ्या मयंक मार्कंडेने जयपूरमध्येही तीच जादू केली. ती खेळपट्टी स्पिनर्सना फायदेशीर ठरणारी होती. मधल्या टप्प्यात चार ओव्हर्समध्ये त्याने २७ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली.
जयदेव उनादकट: पहिल्या फळीत एक विकेट. डेथ ओव्हरमध्ये स्थिरावलेल्या फलंदाजाची विकेट आणि तीही अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत. जयदेव उनादकटने तर सगळा खेळच पालटला!
आकाश माधवाल: त्याने कठीम ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली. दोन ओव्हर्स अगदी सुरूवातीला आणि दोन ओव्हर्स अगदी शेवटच्या टप्प्यात. त्याने प्रचंड प्रयत्न केले आणि शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार दिला नसता तर त्याने खूप कमी धावा दिल्या असत्या. काहीही असलं तरी ४-०-३०-१ ही चांगली आकडेवारी आहे.
कुमार कार्तिकेय: एक प्रभावी खेळाडू म्हणून खेळायला आलेल्या कुमार कार्तिकेयने चांगली कामगिरी केली. राजकोटच्या सपाट खेळपट्टीवर त्याला रेल्वेच्या फलंदाजांना गोलंदाजी करायची होती. हा भरपूर धावा झालेला सामना होता आणि रेल्वेचे फलंदाज कोणालाच ऐकत नव्हते. परंतु त्याने एकामागून एक दोन चेंडूंमध्ये दोन विकेट्स घेतल्या आणि मधल्या ओव्हर्समध्ये धावांना आळा घातला.
आर्यन जुयाल: ५५* धावा| ३६ चेंडू| ७ चौकार| १ षटकार. उत्तर प्रदेश एका आठवड्यात एकही विकेट न देता धडाधड जिंकत असताना आर्यन जुयालची कामगिरी अत्यंत सुंदर ठरली. त्याने दुसऱ्या फळीत येऊन खेळ केला आणि तरीही त्याचा स्ट्राइक रेट १५२.७८ होता.
अर्जुन तेंडुलकर: गोव्याने आठ गोलंदाज वापरले आणि पंजाबने त्यांचा धुव्वा उडवला. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने फक्त दोन ओव्हर्समध्ये १२ धावा दिल्या आणि त्याला पुन्हा खेळायची संधी मिळेपर्यंत सामना आटोपला होता.
रमणदीप सिंग: पंजाबच्या ओपनर्सचा रमणदीप सिंग आणखी एक बळी ठरला. त्याला फार काही खेळायला उरले नाही. त्याने फक्त सात चेंडू खेळले आणि विजयी धावा पूर्ण केल्या.
दिवस 3 – १४ ऑक्टोबर 2022
अनमोलप्रीत सिंग: अनमोलप्रीत सिंगला शांत ठेवण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे त्याला फलंदाजी करायला मैदानात न पाठवणे. आसामच्या गोलंदाजांनी नेमके तेच केले. पंजाबने धावसंख्या पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी फक्त एकच विकेट घेतली.
राहुल बुद्धी: सध्या त्याचा काळ थोडा कठीण आहे. त्याला नेहमीच्या सहाव्या क्रमांकावरून आज चौथ्या क्रमांकावर खेळायला पाठवण्यात आले. त्याने इनिंगच्या सुरूवातीला एक जोरदार चौकार ठोकला. पण त्यानंतर दुर्दैवाने पाच चेंडूंवर आठ धावा करून बाद झाला.
तिलक वर्मा: त्याने जोरदार धावा कराव्यात असं प्रत्येकाला वाटतो आणि तो करतोही. टी२० सामन्यात सलग दोन अर्धशतके करणे फार दुर्मिळ, पण आपल्या हिरोने सलग तीन अर्धशतके पूर्ण केली आहेत. ६२ धावा | ४६ चेंडू | ६ चौकार| २ षटकार. आणि हो, त्याने एक विकेटसुद्धा घेतली आहे बरं का.
कुमार कार्तिकेय: उत्तराखंडच्या फलंदाजाला त्याचा स्पिन आज लक्षात आला. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचा फडशा पाडण्यात आला. कामगिरी ०/४३. वाईट वाटलं ना?
आकाश मढवाल: कर्णधाराच्या भूमिकेला साजेसा खेळ केलाय त्याने. योग्य वेग, अचूकता आणि ४.७५ ची सरासरी. शिवाय मध्य प्रदेशविरूद्ध मोठा विजय मिळवला आहे. आकाश मढवाल, आज खूश तो बहुत होगे तुम!
मयंक मार्कंडे: त्याला त्याचा ओव्हर्सचा पूर्ण कोटा मिळायला तीन सामने जावे लागले. आता मयंक या स्पर्धेत मागे वळून बघणार नाही, अशी आशा आहे. त्रिपुराविरूद्ध हल्ला करणारा तो सहावा गोलंदाज होता. त्ये मधल्या फळीतल्या दोन विकेट्स घेतल्या आणि त्रिपुराच्या इनिंगची ट्रेन रूळावरून घसरली. त्याने २/२४ अशी कामगिरी केलीय.
संजय यादव: संघाला विजय मिळवून देणाऱ्या शेवटच्या धावा फटकवायला मिळणे हे भाग्य सगळ्यांनाच मिळत नाही. संजय यादवला ही संधी मिळाली. अर्थात, त्याला काही फार करायची गरज नव्हती. त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला पाठवले होते. परंतु सलामी फलंदाजांनी धावांचे लक्ष्य जवळपास पूर्ण केले होते. पण हे छोटेसे लक्ष्यदेशीर संजयच्या गोलंदाजीमुळेच शक्य झाले. त्याने तीन ओव्हर्समध्ये फक्त ११ धावा देऊन तीन विकेट्स मटकावल्या.
बसिल थम्पी: डेथ ओव्हरमध्ये बसिल थम्पीचा खेळ थोडा डळमळला पण त्याने सुरूवात मस्त केली होती. त्याने आपल्या ओव्हरमध्ये लवकर विकेट घेऊन आधीच ढासळत चाललेला हरयाणाचा किल्ला ४१/४ वर आणून ठेवला. शेवटच्या टप्प्यात त्याने मात्र गडबड केली आणि चार ओव्हर्समध्ये ४० धावा देऊन १ विकेट घेतली.
आर्यन जुयाल: उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा त्यांच्या फलंदाजांसाठी फार काही शिल्लक ठेवले नाही. पण तरीही आर्यन जुयालचा दिवस वाईट होता. तो पॉवर प्लेमध्ये ११ धावा करून स्पिनवर गडबडून बाद झाला.
जयदेव उनादकट: जयदेव उनादकटचा दिवस फारच अप्रतिम होता. त्याने आणि त्याच्या टीमने नागालँडला फक्त ९७ धावांमध्ये गुंडाळून टाकले. त्याच्या चेंडूचा नूरच वेगळा होता. तो मध्येच स्विंग होत होता. त्याने अत्यंत कमी धावा देऊन खूप लवकर विकेटही घेतली.
अर्जुन तेंडुलकर: एखाद्या खेळाडूचा एक दिवस असतो, तसे अर्जुन तेंडुलकरचा तो दिवस होता. त्याने चार विकेट घेतल्या. टी२० मध्ये ही मोठीच कामगिरी आहे. पण कहानी अभी खत्म नहीं हुई दोस्त! त्याने चार ओव्हर्समध्ये चार विकेट घेऊन फक्त १० धावा दिल्यात. तेही गोवाविरूद्धच्या सामन्यात जिथे गोव्याने १७७ धावा फटकावल्या! आता बोला!
दिवस २ – १२ ऑक्टोबर २०२२
अनमोलप्रीत सिंग: आता थोडक्यात सांगायचे तर तो सध्या फुल फॉर्ममध्ये आहे. तो अजिबात चूक करत नाही, वेळ घालवत नाही. तो नुसता वॉर्मअप करत नाही तर फील्डवर आग लावतोय. त्याने पहिल्या सामन्यात हैदराबादविरूद्ध ४० चेंडूंमध्ये पन्नास धावा केल्या आणि आता दिल्लीविरूद्ध ४७ चेंडूंमध्ये ६४ धावा करून प्रेक्षकांना अचंबित केलंय.
राहुल बुद्धी: पॉन्डिचेरीविरूद्धच्या सामन्यात विकेट खूप कठीण होती आणि धावाही कमी झाल्या होत्या. राहुल बुद्धी १७ व्या ओव्हरमध्ये खेळायला आला. तो मैदानात फार टिकला नाही. त्याने फक्त तीन धावा केल्या. पण ही तर फक्त सुरूवात आहे. बुद्धीसारख्या फिनिशर्सना फक्त एका मोठ्या संधीची गरज आहे. मग त्याची बॅट तळपल्याशिवाय राहणार नाही.
तिलक वर्मा: एक नवीन सकाळ, नवीन सूर्योदय आणि आणि नवीन अर्धशतक. टी२० मध्ये तुम्ही सातत्यपूर्ण खेळ करू शकता असं नाही. पण तिलक वर्मा त्याला अपवाद आहे. हैदराबादच्या फलंदाजांना पुदुच्चेरीविरूद्ध चाचपडत खेळावे लागले. तिलक वर्मा मैदानात उतरला. आपल्या संघाला सावरणारा खेळ करताना त्याने चार षटकार आणि एक चौकार फटकावत ४१ चेंडूंमध्ये ५७ धावा केल्या.
रमणदीप सिंग: दिल्लीविरूद्धच्या सामन्यात कठीण पाठलाग करत असताना डेथ ओव्हरमध्ये रमणदीप सिंगला फार काही चांगले खेळता आले नाही. तो खेळायला आला तेव्हा शेवटच्या चार ओव्हरमध्ये ४५ धावांची गरज होती. पण दुर्दैवाने त्याला फक्त आठ चेंडूंमध्ये सहा धावा करता आल्या. खरे सांगायचे तर या फिनिशर्सवर सगळ्यांत कठीण आणि मोठी जबाबदारी असते.
अर्जुन तेंडुलकर: तेंडुलकर हे नाव कधीच आपल्या चाहत्यांना निराश करत नाही. जोरदार सुरूवात केल्यानंतर अर्जुनने आपला खेळ आणखी उंचावला. त्याने पटापट दोन विकेट्स घेऊन मणिपूरच्या इनिंग्सची गाडी घसरवत नेली आणि २/२० ची कामगिरी करून खेळ संपवला. पण मणिपूरला पुन्हा उभे राहणे अशक्य झाले.
हृतिक शौकीन: दोन ओव्हरमध्ये १७ धावा म्हणजे फार काही जोरदार खेळ नाही. पण अवघ्या १७ चेंडूंमध्ये ३३ धावा कुटणाऱ्या अभिषेक शर्माला त्याने बाद केलं. त्यामुळे सामना हातातून निसटता निसटता वाचला.
आकाश मढवाल: त्याच्या संघातल्या फलंदाजांनी बचाव करण्यासाठी फार धावा ठेवल्या नव्हत्या आणि चांगली सुरूवात झाल्यानंतरही आसामच्या मधल्या फळीतल्या खेळाडूंनी डेथ ओव्हर्समध्ये आकाश मढवालचा सामना केला. त्यामुळे त्याचा खेळ: ३-०-३६-१ असा संपला.
जयदेव उनादकट: पहिल्या सामन्यात पावसामुळे जयदेव उनादकटला संधी मिळाली नाही. परंतु दुसरा सामना मात्र त्याच्यासाठी चांगला ठरला. बडोद्याविरूद्धच्या सामन्यात आपल्या संघाला विजयाकडे नेताना सुरूवातीला तो थोडा महागडा खेळला. पण नंतर काही मोठ्या खेळाडूंविरूद्ध डेथ ओव्हर्समध्ये त्याने चांगले पुनरागमन केले. त्याने अंबाटी रायाडूला पहिल्याच चेंडूवर शून्यावर घरी पाठवले. त्याची आकडेवारी: ४-०-३३-१.
कुमार कार्तिकेय: या गूढ स्पिनरसाठीचा आजचा दिवस फार काही चांगला नव्हता. एकतर त्याला आधी नवीन चेंडू दिला गेला. त्यानंतर मुंबईच्या सलामी फलंदाजांनी त्याच्यावर राजकोटच्या हलक्याफुलक्या पिचवर हल्ला केला. अर्थात त्याने मध्य प्रदेशसाठी पृथ्वी शॉला बाद करून आशेचा किरण आणला. पण तेवढे पुरेसे ठरले नाही.
मयंक मार्कंडे: याही वेळी मयंक मार्कंडेला फार काही खेळायची संधी मिळाली नाही. दिल्लीच्या मधल्या फळीतल्या खेळाडूंनी जोरदार फटकेबाजी करत भरपूर धावसंख्या उभारली. परंतु त्याला फक्त एकच ओव्हर खेळायला मिळाली. त्यात त्याने ११ धावा केल्या. याचे कारण काय असेल असे तुम्हाला वाटत असेल तर या वेळी पंजाबने आठ गोलंदाज खेळवले.
संजय यादव: तामिळनाडूसाठी हा दिवस अगदी सोप्पा होता. पण संजय यादवला बहुतेक तो लवकरात लवकर विसरावा लागेल. एक मोठी भागीदारी संपल्यावर तो खेळायला आला आणि पाठलागाचा खेळ त्यांच्या हातात होता. पण तो फक्त पाच चेंडूंमध्ये शून्यावर पॅव्हिलियनला परतला.
बसिल थम्पी: कर्नाटकच्या दिमाखदार खेळाडूंच्या संघाने पाठलाग अत्यंत चांगल्या प्रकारे केला. पण बसिल थम्पीने फक्त एक विकेट घेतली आणि तीन ओव्हर्समध्ये तब्बल २८ धावा देऊन टाकल्या.
आर्यन जुयाल: रनआऊट होणे हे कुणालाच आवडत नाही आणि तेही तुम्ही अगदी नुकतीच खेळायला सुरूवात केली असेल तर. आर्यन जुयालसाठी हा दिवस तसा होता. त्याने १७ चेंडूंमध्ये १४ धावा केल्या आण बाद झाला.
दिवस १ – ११ ऑक्टोबर २०२२
अनमोलप्रीत सिंग: सुरूवातीला मोजूनमापून खेळ आणि शेवटी मात्र धडाका. अनमोलप्रीत सिंग पंजाबसाठी हैदराबादविरूद्ध सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याला पहिली धाव काढायला सहा चेंडू लागले. त्यानंतर तो १८ व्या ओव्हरपर्यंत एक चेंडू एक धाव असा खेळत होता. नंतर मात्र त्याची बॅट तळपली. तो अर्धशतकापर्यंत पोहोचला आणि संघालाही एक मजबूत धावसंख्या उभारायला मदत केली.
राहुल बुद्धी: हैदराबादच्या खेळाप्रमाणेच राहुल बुद्धीला अजूनही चांगल्या खेळाची आशा आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणे ही काही सोपी गोष्ट नाही आणि तेही अशा फलंदाजीच्या क्रमात जिथे आधीच्या सगळे फलंदाज चाचपडत आहेत. दोन आकडी धावसंख्या करणाऱ्या तीन खेळाडूंपैकी तो एक होता. त्याने २१ चेंडूंमध्ये २० धावा केल्या आणि चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या तिलक वर्मासोबत त्याने चांगली भागीदारी केली. पण त्याचा खेळ बहरला नाही.
तिलक वर्मा: एक असतो तडाखेबाज खेळ, एक असतो वेगवान खेळ आणि एक असतो तिलक वर्माचा खेळ. अवघ्या सात महिन्यांपूर्वी तो १९ वर्षांखालील वयोगटात होता हे सांगितले तर कोणाचाही विश्वास वसणार नाही. तो सर्व प्रकारांमध्ये आपले अवकाश विस्तारतो आहे. इंडिया ए मध्ये फर्स्ट क्लास शतक आणि लिस्ट ए अर्धशतक केल्यानंतर वर्माच्या नावाची चर्चा टी२० च्या वर्तुळात सुरू झाली. हैदराबादच्या इनिंगमध्ये चमकदार खेळणारा हा एकमेव दाक्षिणात्य खेळाडू आहे. त्याने पंजाबला हरवताना फक्त ३८ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले.
रमणदीप सिंग: पंजाबचा खेळ संपत असताना रमणदीप सिंगला फक्त दोन चेंडू खेळायची संधी मिळाली. त्यामुळे त्याला फार काही खेळता आले नाही पण त्याने त्या दोन चेंडूंमध्ये तीन धावा केल्या.
अर्जुन तेंडुलकर: जवळपास २० महिन्यांनी टी२०चा सामना खेळायला मिळणे, तोही गोव्याकडून खेळता येणे. त्यामुळे तुम्हाला तुमचा खेळ चांगला करण्यासाठी वेळ मिळतो. पण अर्जुन तेंडुलकरला तो मिळाला नाही. त्याने नवीन चेंडू वापरला, तो स्विंग केला. विकेट्स घेतल्या नाहीत, पण त्रिपुराविरूद्थ तीन ओव्हर्समध्ये फक्त २० धावा दिल्या.
मुरूगन अश्विन: अत्यंत हुशार, कमी धावा देणारा आणि हळूच रडारखाली येणारा खेळाडू. मुरूगन अश्विन मागच्या अनेक वर्षांपासून हे करतोय आणि छत्तीसगडविरूद्ध त्याचा सामना असाच एक ठरला. त्याने तीन ओव्हर्समध्ये फक्त १४ धावा दिल्या. खूप मस्त, अश्विन.
हृतिक शौकीन: सर्वप्रथम सांगायचे तर आपल्या खेळाडूने इतिहास घडवलाय. तो या सामन्यातला पहिला इम्पॅक्ट प्लेयर ठरला आहे. त्यानंतर क्रिकेटबद्दल सांगायचे झाल्यास त्याचा खेळ तडफदार होता. मणिपूरविरूद्धच्या सामन्यात त्याच्या स्पिनने त्यांच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. त्यांचा खेळ फक्त १०० धावांत आटोपला.
आकाश मढवाल: कर्णधाराच्या खेळाबद्दल सांगायचे तर आकाश मढवालबद्दल बोलायलाच हवे. त्याने नवीन चेंडूने एक विकेट घेऊन सामन्याचा पाया रचला आणि त्यानंतर इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेऊन ४-०-२५-४ अशा धावा दिल्या. त्याच्यामुळे राजकोटमध्ये झालेल्या सामन्यात रेल्वेला फक्त १५० धावांमध्ये गाशा गुंडाळावा लागला.
कुमार कार्तिकेय: मधल्या ओव्हरमध्ये अत्यंत शांतपणे खेळताना कुमार कार्तिकेयने आपल्या चार ओव्हर्समध्ये राजस्थानविरूद्ध १/२० असा खेळ करून त्यांच्या धावसंख्येला आळा घातला आणि या सामन्यात विजय मिळवायला मदत केली.
मयंक मार्कंडे: हैदराबादने धावसंख्येच्या पाठलागात थोडक्यात बचाव केला. त्या सामन्यात मयंक मार्कंडेला फार काही करायचे नव्हते. त्याने फक्त एक-दोन ओव्हर्स टाकल्या.
संजय यादव: लखनौच्या अत्यंत कठीण खेळपट्टीवर त्याने आपल्या संघाला विजयाची आशा निर्माण करून दिली. पण त्याला खेळ पुढे न्यायला जमले नाही. त्याने गोलंदाजी केलेल्या ओव्हरमध्ये एक विकेट घेतली आणि एक जोरदार सिक्सही मारला. पण नंतर तामिळनाडूच्या संपूर्ण फलंदाजांच्या फळीप्रमाणेच त्याचाही खेळ ढासळला.
बसिल थम्पी: पावसामुळे ११ ओव्हर्स इतक्या कमी केलेल्या सामन्यात बसिल थम्पीने हल्ला सुरू केला आणि तीन ओव्हर्समध्ये १८ धावांची कामगिरी केली.
आर्यन जुयाल: फलंदाजी सुरू करून छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने इनिंग्समध्ये उत्तम खेळ केला. आज फक्त ९४ धावांचा पाठलाग करायचा होता. तो व्हीजेडी पद्धतीने संपला. पण त्याने ३४ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या.