News

#NZvIND एकदिवसीय मालिका पूर्वावलोकनः मिशन २०२३ वर्ल्डकप

By Mumbai Indians

भारताने टी२०आय मालिका खिशात टाकून नेपियरला अलविदा केले. आता पुढचा टप्पा आहे ऑकलंडमध्ये कारण भारतीय संघ आता न्यूझीलंडविरूद्ध दीर्घकाळ चालणारी व्हाइट बॉल क्रिकेट मालिका खेळणार आहे. शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या तीन सामन्यांच्या ओडीआय मालिकेत संघाचे नेतृत्व हिटमॅन किंवा हार्दिक पंड्या करणार नाहीये तर शिखर धवन ऊर्फ गब्बर करणार आहे. हॅमिल्टन आणि ख्राइस्टचर्चमध्ये खालील सामने खेळले जातील.  

भारत धवनच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत एकही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका हरलेला नाही. परंतु न्यूझीलंड हे भारताला विजयासाठी सर्वोत्तम मैदान ठरलेले नाही. त्यांनी मागील वेळी म्हणजे २०२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावेळी अत्यंत क्वचित होणाऱ्या ३-० व्हाइटवॉशनंतर आणि न्यूझीलंडमध्ये किवीजविरूद्ध ४२ एकदिवसीय सामन्यांपैकी फक्त १४ सामने जिंकल्यानंतर गब्बर आता हिशोब चुकता करण्याच्या मूडमध्ये आहे.

भारत या मालिकेसोबत आपल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषकाची तयारी सुरू करणार आहे. त्यामुळे संजू सॅम्सन आणि स्पीडस्टर उमरान मलिक यांना या वेळी तरी संधी मिळते की टी२०आय मालिकेप्रमाणेच बसून राहावे लागते हे पाहणे रंजक ठरेल. दरम्यान, केन विल्यमसन आधीच ठरलेल्या वैद्यकीय अपॉइंटमेंटमुळे तिसरा टी२०आय सामना चुकलेला केन विल्यमसन यजमान संघात परतणार आहे.

काय: न्यूझीलंड विरूद्ध भारत, ३ सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका.

कधी: २५ नोव्हेंबर, २७ नोव्हेंबर आणि ३० नोव्हेंबर.

कुठे: ऑकलंड, हॅमिल्टन आणि ख्राइस्टचर्च

ते काय म्हणतात

“ही सगळी आगामी विश्वचषकाची तयारी आहे. खेळाडू खूप चांगल्या प्रकारे तयार होत आहेत. त्यांचा खेळ चांगला आहे आणि विश्वचषकासाठीच्या संघात कोणाला संधी मिळेल याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे." – भारतीय कर्णधार शिखर धवन.

"[मार्टिन] गुप्तिल निवृत्त झालेला नाही. तो खेळण्यासाठी उपलब्ध असताना इतरही काही सामने खेळण्यासाठी प्रयत्नशील आहे. खेळाडूच्या आयुष्यात नेहमीच चढउतार येतात आणि विविध टप्प्यांमधून जावे लागते. तुम्ही शक्य तितक्या प्रकारे त्याचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत असता."– न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन.

काय अपेक्षा आहे: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी विराट कोहली, जसप्रीत बुमरा आणि केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आल्यामुळे स्काय, शुभमन गिल, दीपक हूडा, श्रेय अय्यर आणि इतर नवीन खेळाडूंना संधी मिळू शकते आणि ते पुढील वर्षाच्या विश्वचषक संघात दावा लावू शकतात.

आपण काय करायचे आहे: चला तर मग, तयार व्हा! टी२० मालिकेत पावसाने विचका केला पण ऑकलंडमध्ये चांगले कडकडीत ऊन आहे. दिवसभरात पावसाचे काहीही भाकीत नाही आणि तापमान साधारण १६ अंश सेल्सियस असेल अशी अपेक्षा आहे.