News

टाटा आयपीएल २०२५ च्या उर्वरित कालावधीसाठी विघ्नेश पुथूरऐवजी रघू शर्मा खेळणार

By Mumbai Indians

 

दोन्ही पायांमधील हाडांवर ताण आल्यामुळे सीझनमधून बाहेर गेलेल्या विघ्नेश पुथूरऐवजी पंजाबचा लेग स्पिनर रघू शर्मा खेळणार आहे.

रघू हा मुंबई इंडियन्सच्या राखीव गोलंदाजांपैकी एक होता. तो आता मुख्य संघात आला आहे. 🙌

त्याने पंजाब आणि पॉन्डिचेरीसाठी ११ फर्स्ट क्लास, नऊ लिस्ट ए आणि तीन टी२० सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत आपल्या फर्स्ट क्लास करियरमध्ये सलग पाच विकेट्स आणि तीनवेळा १० विकेट्स घेतल्या आहेत. या ३२ वर्षीय खेळाडूने विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ मध्ये पंजाबकडून उत्तम कामगिरी करत आठ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या.

विघ्नेशने मुंबई इंडियन्ससाठी पाच सामने खेळले. त्याने सहा विकेट्स घेतल्या आणि सीएसकेविरूद्ध तीन विकेट्स घेऊन पहिलाच सामना अविस्मरणीय केला. 💪

तो आपल्यासोबत राहणार आहे. मुंबई इंडियन्स मेडिकल आणि एसअँडसी टीमसोबत आपली तब्येत आणि उपचार यांच्यावर लक्ष केंद्रित करेल. आमच्याकडून त्याला प्रकृतीसाठी खूप शुभेच्छा!