“सीझनची ही सुरूवातच आहे. परंतु आम्ही पुन्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करू”: महेला जयवर्धने

By Mumbai Indians

तीन तास पाऊस आणि ओलेचिंब मैदान या पार्श्वभूमीवर आपली टीम मैदानात उतरली तेव्हा आपल्या योजनेप्रमाणे काहीही घडले नाही. एकूणात ही संध्याकाळ विसरून जाण्यासारखी आणि तात्काळ त्या विचारातून बाहेर पडण्यासारखी होती. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मंगळवारी राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागलेल्या सामन्यातील २७ धावांनी पराभवानंतर पत्रकार परिषदेत संवाद साधला.

“आमच्या डोक्यात काही योजना होत्या. परंतु आम्हाला त्या हव्या तशा पूर्ण करता आल्या नाहीत,” असे ते म्हणाले. “मार्जिन्स खूप कमी होते. हे सगळे खूप छान फलंदाजी करत आहेत आणि आम्हाला पावसामुळे रोखल्या गेलेल्या सामन्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीचा अंदाज होता. कारण त्यांना त्याचा फायदा मिळणार होते. पहिल्या चार पाच ओव्हर्स आमच्यासाठी महत्त्वाच्या होत्या. आम्ही नंतरच्या टप्प्यात चांगली गोलंदाजी केली असे मला वाटते. आमच्या चेंडूंची लांबी, रेषा चुकल्या. त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली.”

रॉयल्सचे सलामी फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी हार मानत नव्हते. त्यांना पहिल्यापासूनच लय गवसली होती आणि त्यांनी फक्त पाच ओव्हर्समध्ये ८० धावा पूर्ण केल्या. परंतु इनिंगच्या दुसऱ्या टप्प्यात एमआयच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यांनी आरआरला १५० धावांवर रोखले. ही धावसंख्या पाठलाग करण्याजोगी होती असे महेला यांनी सांगितले.

“प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला धावसंख्या उभारता येऊ शकते तर आम्हालाही नक्कीच येऊ शकते. आमच्याकडे ती क्षमता होती आणि तसे फलंदाजही होते. परंतु आमची लय हरवली आणि चांगली भागीदारी करू शकलो नाही. अंतिमतः चार षट्कारांचा फरक पडला. आम्हाला ही लयच सापडी नाही. पहिल्या फळीतील फलंदाजांना ४० पैकी ३० धावा करता आल्या नाहीत. ही धावसंख्या आम्ही पूर्ण करू शकणार नाही असे आम्हाला वाटलेच नाही. पुढे जाताना एक चांगली किंवा एक दोन चांगल्या भागीदारी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. परंतु आज त्यांचा खेळ खूप खूप चांगला झाला. आम्ही पुरेसे चांगले खेळलो नाही आणि त्यावर आम्हाला काम करायची गरज आहे,” असे ते म्हणाले.

कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध वानखेडेवर विक्रमी पाठलाग पूर्ण केल्यानंतर आणि पहिल्या लीग सामन्यातील विजयाचा १४ वर्षांचा दुष्काळ भरून काढल्यानंतर मुंबई इंडियन्सला मागील दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. अजूनही बरेच सामने बाकी आहेत आणि घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. जयवर्धनेदेखील खूप चिंतेत नव्हते. पुन्हा एकदा नीट रचना आणि सराव करून त्यानंतर रविवारी (१२ एप्रिल) रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध तूफानी सामन्यासाठी घरी परतण्याबाबत ते आग्रही होते.

“अशा प्रकारच्या स्पर्धेत प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. आमची सुरूवात चांगली झाली. त्यानंतर एक दोन सामने हरलो आणि आता आम्हाला शांतपणे बसून नक्की कुठे सुधारणा करायची आहे ते पाहणे गरजेचे आहे. आम्हाला काय करायची गरज आहे ते सर्वांना माहीत आहे परंतु तो विश्वास आणि आत्मविश्वास ठेवून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. आम्ही म्हणतोय की ही सीझनची फक्त सुरूवात आहे परंतु एकत्र येऊन नव्याने कार्यप्रणाली आखणे गरजेचे आहे.”