News

स्काय, हरमन यांचा सर्वोच्च विसडेन क्रिकेट पुरस्काराने गौरव

By Mumbai Indians

पायघड्या घाला. दरवाजे सताड उघडा. टाळ्या वाजवा आणि विसडेन लीडिंग टी२० क्रिकेटर इन दि वर्ल्ड ठरलेल्या सूर्यकुमार यादवचे आणि क्रिकेटर ऑफ दि इयर ठरलेल्या पहिली महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर यांचे खुल्या दिलाने स्वागत करा. हे दोघेही आपला अभिमान आहेत!

आपला दादा सूर्यापासून सुरूवात करूया. टी२०आयमधले २०२२ हे वर्ष स्कायसाठी एका नवीन सत्राप्रमाणे होते. तो जिथे कुठे गेला तिथे त्याने धावा कुटल्या. तब्बल १८७.४३ अशा घसघशीत स्ट्राइक रेटने त्याने ११६४ धावा केल्या आहेत. त्यात ६८ षटकार आहेत जे कॅलेंडर वर्षात कोणत्याही टी२०आय फलंदाजाने फटकावलेले नाहीत.

त्याची दोन शतके आणि नऊ अर्धशतके. त्यातील तीन तर २०२२ टी२० वर्ल्ड कपमध्येच आहेत. त्यामुळे भारताला मागच्या वर्षी ४० सामन्यांपैकी २८ सामने जिंकता आले. २०२२ मधला सर्वांत अविस्मरणीय सामना? नॉटिंगहमवर ५५ चेंडूंमध्ये केलेल्या ११७ धावा. हे त्याचे पहिले टी२० शतक ठरले.

हरमनबाबत सांगायचे झाले तर २०२३ विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅकमध्ये घोषित करण्यात आलेल्या पाच क्रिकेटर्स ऑफ दि इयरपैकी ती एक आहे. भारतीय महिला क्रिकेटची २०२२ मधली चॅम्पियन ठरलेल्या हरमनसाठी हा एक गौरव होता. तिने इंग्लिश भूमीवर विमेन इन ब्लूला १९९९ सालानंतरचा पहिला ३-० ने ओडीआय विजय मिळवून दिला आणि २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिच्या नेतृत्वाखाली संघाने रौप्यपदक मिळवले.

तिने ७५४ ओडीआय धावा केल्या. त्यात इंग्लंड ओडीआयमधल्या नाबाद १४३ धावा आहेत. शिवाय तिने टी२०आयमध्ये ५२४ धावा केल्या आहेत. आपली सुप-हर-मन इतिहास रचतेय आणि आपल्या बुद्धिमत्ता आणि खेळाप्रति असलेल्या वचनबद्धतेद्वारे विक्रम मोडीत काढतेय.

पलटन, संपूर्ण #OneFamily, आणि संपूर्ण देशाला त्यांच्या कामगिरीचा अभिमान वाटतो. आता हरमनने किताब जिंकलाय आणि सूर्या तर या चविष्ट केकवर आणखी एक चेरी लावतोय.