News

सूर्यकुमार यादव, आमचा मि. ३६० आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये भारताचा ट्रंप कार्ड ठरू शकतो

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या आगामी आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये खेळण्यासाठी टीम इंडियात आपले स्थान जवळपास पक्के केले आहे.

हा धडाकेबाज खेळाडू आयसीसी टी२०आय खेळाडूंच्या श्रेणीत सर्वांत वरच्या श्रेणीचा भारतीय फलंदाज आहे. तो वेस्ट इंडिजविरूद्ध खेळलेल्या तिसऱ्या टी२०आयमध्ये ४४ चेंडूंमध्ये ७६ धावा कुटल्यानंतर आयसीसी मेन्स टी२०आयच्या फलंदाजी श्रेणीत दुसऱ्या स्थानावर आला आहे.

अहमदाबाद येथे २०२१ मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरूद्ध टी२०मधील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर त्याने खेळाच्या या स्वरूपात आपले स्थान बळकट केले आहे.

आपल्या टी२०आयच्या छोट्या करियरमध्ये या ३१ वर्षीय खेळाडूने तब्बल १७६ च्या स्ट्राइक रेटने २१ सामन्यांमध्ये ५७२ धावा कुटल्या आहेत. त्याने ३५.७५ ची सरासरीही राखली आहे. यादवने आतापर्यंत टी२०आय स्वरूपात एकशे चाळीस अर्धशतके नोंदवली आहेत.

भारताच्या इंग्लंड २०२२ च्या दौऱ्यादरम्यान सूर्यकुमारने पुन्हा एकदा आपली अदभुत फलंदाजीची क्षमता दाखवली आहे. त्याने जुलैमध्ये सुरूवातीला नॉटिंगहममधील टेंट ब्रिज क्रिकेट मैदानावर आपले पहिले टी२०आय शतक झळकवले.

हा उजव्या हाताने खेळणारा फलंदाज चौथ्या क्रमांकावर खेळत होता. त्याने २१२.७३ च्या स्ट्राइक रेटने फक्त ५५ चेंडूंमध्ये ११७ धावा फटकावल्या आणि गोलंदाजांच्या नजरेसमोर भर दिवसा तारे चमकले. या खेळीत त्याने १४ चौकार आणि सहा षटकार फटकावले. रोहित शर्माच्या टी२०आय मधील भारतासाठीच्या सर्वाधिक ११८ धावांच्या खेळीची बरोबरी करण्यासाठी सूर्यकुमारला फक्त एक धाव कमी पडली.

स्कायला टी२०आय सामन्यांमध्ये इंग्लंडविरूद्ध फलंदाजी करायला आवडते. टेंट ब्रिजवरील त्याची ११७ धावांची खेळी या तीन लायन्सविरूद्ध पाच टी२०आय इनिंग्समध्ये २६० धावांपर्यंत गेली. त्याची २०१० च्या वर्ल्डकप विजेत्यांविरूद्ध बॅटिंगची सरासरी ५२.०० तर स्ट्राइक रेट १९५.४८ आहे.

सूर्यकुमारने फक्त भारतासाठीच आपली गुणवत्ता सिद्ध केलेली नाही तर तो मागील अनेक वर्षांत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्सचा सर्वाधिक सामने जिंकून देणारा खेळाडू ठरला आहे.

आयपीएल २०२२ मध्ये फक्त आठच सामने खेळल्यानंतरही या मधल्या फळीतील फलंदाजाने ४३.२९ ची सरासरी आणि १४५.६७१ च्या स्ट्राइक रेटने ३०३ धावा काढल्या आहेत. दुखापतीमुळे तो खेळातून बाहेर पडण्यापूर्वी त्याने तीन अर्धशतकेही फटकावली होती.

सूर्यकुमार यादवची सातत्यपूर्णता वाखाणण्यासारखी आहे. त्याने आपल्या मागील पाच आयपीएल स्पर्धांमध्ये प्रत्येकी ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

२०१८ च्या सीझनदरम्यान हा खेळाडू मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने ३६.५७ च्या सरासरीने १४ सामन्यांत ५१४ धावा केल्या. त्यात त्याच्या नावावर चार अर्धशतकेही आहेत. आतापर्यंतचा या उच्च प्रोफाइल लीगमधील हा त्याचा सर्वोत्तम खेळ होता.

सूर्यकुमारने टी२० लीगमध्ये आतापर्यंत १२३ आयपीएल सामन्यांत ३०.३९ च्या सरासरीने आणि १३६.७८ च्या स्ट्राइक रेटने २६४४ धावा केल्या आहेत. त्याने १६ अर्धशतकेही फटकवली आहेत.

भारताचा ३६० डिग्री खेळाडू म्हणून बहुमान मिळालेल्या सूर्यकुमार यादवच्या पोतडीत खूप सुंदर शॉट्स आहेत. त्याचे कव्हर ड्राइव्ह, फ्लिक, स्वीप बिहाइंड स्क्वेअर, क्लासिक पुल, थर्ड मॅनकडे कट शॉट, बैठक, स्वीप आणि स्कूप हे शॉट्स डोळ्यांचे पारणे फेडतात.

अलीकडेच सूर्यकुमारने वेस्ट इंडिजविरूद्ध आपल्या ४४ चेंडूंमध्ये ७६ धावा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. दहाव्या ओव्हरमध्ये स्कायने अल्झारी जोसेफचा चेंडू वाइड लाँग ऑफवर ७९ मीटरवर भिरकावून षटकार मारला. या शॉटचे निवेदक आणि भारतीय चाहत्यांनी खूप कौतुक केले आणि इंटरनेटवर त्याची पारायणे केली जात आहेत.

आपला स्काय अत्यंत चाणाक्ष फलंदाज आहे. तो या वर्षात नंतरच्या काळात आयोजित होणाऱ्या आगामी आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये सामने जिंकून देण्यासाठी सज्ज असेल.